▪️पेल्लोरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील – आमदार देवराव भोंगळे
▪️पेल्लोरा येथील काँग्रेस, शेतकरी संघटना यांचेसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्याचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास,पायाभूत सुविधा आणि जनकल्याण हे आमचे मुख्य ध्येय असून गावोगावी रस्ते पाणीपुरवठा ,आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत मूलभूत सोयीसुविधा पोहचविणे ही आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवून विकासकामे अधिक जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. ग्रामीण भागासह पेल्लोरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
राजुरा तालुक्यातील पेल्लोरा येथील काँग्रेस, शेतकरी संघटना यांचेसह विविध पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून आज (दि.२०) राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
आमदार देवराव भोंगळे पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामांना गती देण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार भोंगळे यांनी दिली.
यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये मोहन भोयर, मंगेश कायरकर, विठ्ठल अडबाले, किशोर काळे, एकनाथ टोंगे, चंदू बोंडे, रवींद्र मडावी, सूर्यभान खुजे, प्रवीण भोयर, बबन थेरे, प्रणय थेरे, लक्ष्मण लांजेकर, विलास अहिरकर, प्रज्ञाशील करमणकर, संजय राव, केशव अडवाले, रामदास भोयर, अरविंद मडावी, बाबाकर कुळमेथे, गणपत अहिरकर, रामकिसन धानोरकर, विठ्ठल दाते , विठ्ठल आत्राम, लोकेश भोयर, राहुल भोयर, मंगेश भोयर, गजानन जुनघरी, रवींद्र बांदुरकर, अनिल उपरे, गणेश झाडे, प्रभाकर झाडे , सुनील अडबाले, वारलू भोयर, गोपीनाथ टोंगे यांचा समावेश आहे.
राजुरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून आम्ही सर्वांगीण विकासासाठी भाजपात जाहीर पक्षप्रवेश करीत असल्याची भावना नवप्रवेशीत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपाचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सचिन बल्की, नगरसेवक भूपेश मेश्राम, प्रफुल कावळे,भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, विनोद नरेंदुलवार, शंकर धनवलकर, सागर भटपल्लीवार, उमेश गोरे, अमोल मोरे, वैभव पावडे, सुभाष गोरे, प्रदीप बोबडे, प्रदीप मोरे,सचिन शेंडे, दीपक रासेकर,राजेश वाटेकर,विवेक राठोड, अकबर पठाण, तुषार कोरडे, राकेश आदे, अमोल सोनेकर यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


