आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️तेंदू हंगामात हंगामात वाढला हिस्त्र प्राण्यांचा धोका; चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: (इंडिया २४ न्युज)
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही उपक्षेत्रात २२ मे २०२६ रोजी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गुंजेवाही येथील चार महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत
१. कु. कवठाबाई दादाजी मोहूर्ले वय 45 वर्ष
२. कु. अनुबाई दादाजी मोहूर्ले वय 40 वर्ष
३. सौ. संगीता संतोष चौधरी वय 50 वर्ष
४. श्रीमती सुनिता कौशिक मोहूर्ले वय 38 वर्ष
सर्व राहणार गुंजेवाही
सदर महिला सकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास गुंजेवाही बीट क्रमांक १८३६ पी. एफ. परिसरात तेंदूपत्ता संकलन करत असताना ही घटना घडली. प्राथमिक तपासणीत चौघीचाही मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच, वनपरिक्षेत्राधिकारी, वन कर्मचारी, आरआर यु पथक तसेच पोलीस प्रशासन, घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले.

दरम्यान मृताच्या वारसांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात आले. एकूण एक लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली त्यानुसार
कवठाबाई दादाजी मोहूर्ले व अनुबाई दादाजी मोहूर्ले यांचा वारसदार श्री रमेश दादाजी मोहूर्ले यांना ५० हजार रुपये
संगीता संतोष चौधरी यांचा पती श्री संतोष अआडकू चौधरी यांना २५ हजार रुपये
श्रीमती सुनिता कौशिक मोहूर्ले यांचा वारसदार श्री चंद्रकांत सुधाकर मोहूर्ले यांना २५ हजार रुपये देण्यात आले.
तेंदू हंगामात जंगल परिसरात हिंस्त्र प्राण्याचा धोका वाढत असल्याचे जाणकाराचे मत आहे. हिंस्त्र प्राण्याचे वास्तव्य नेमके कुठे आहे याची माहिती मुख्यतः स्थानिक नागरिकांनाच असते त्यामुळे स्थानिक मजूर साधारणपणे धोकादायक भाग टाळतात. बाहेरगावाहून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून येणारे मजूर अधिक तेंदूपत्ता मिळविण्याच्या उद्देशाने अनोळखी जंगल भागात प्रवेश करतात त्यामुळे अशा दुर्घटनेची शक्यता वाढत असल्याचे सांगितले जात आहे
वन, विभागाने मजुराने आपल्या गावाच्या हद्दीतच तेंदूपत्ता संकलन करावे तसेच अनोळखी किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे असे आवाहन केले आहे. जंगल परिसरात कॅमेरा ट्रॅप गस्त वाढविणे आणि जन जागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.