▪️चंद्रपुर शहर पोलीस स्टेशनची मोठी धडक कार्यवाही..
▪️१,५४,४९०/- रू ची विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..

*🔸कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील डि.बी. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पो. स्टे. परीसरामध्ये पेट्रोलींग करीत असता पो. उपनि. दत्तात्रय कोलटे यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की, एकोरी वार्ड, येथे सुनिलकुमार मुल्ले हे त्यांचे राहाते घरी अवैध्यरित्या विदेशी दारू बाळगुन विक्री करीत असल्याबातची खबर मिळाल्याने सदर ठिकाणी पो. स्टॉफ व पंचासह जावुन प्रोव्ही रेड केली असता नमुद आरोपी नामे सुनिलकुमार राजकुमार मुल्ले, वय ५६ वर्ष, रा. एकोरी वार्ड, चंद्रपुर यांचे राहाते घरी अवैध्यरित्या एकुण १,५४,४९०/- रू ची विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष नमुद माल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी इसमाविरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध कमांक ७२३/२०२५ कलम ६५ (ई) म.दा. का. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री सुधाकर यादव सा., मा. पोलीस निरीक्षक, श्री. निक्षीकांत रामटेके, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात सपोनी राजेंद्र सोनवने, पोउपनि कोलटे, निकोडे, पोहवा लक्ष्मन रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, मपोहवा भावना रामटेके, नापोअ कपुरचंद खरवार, पोअं रूपेश पराते, प्रफुल भैसारे, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, मपोअ दिपीका झिंगरे, सारीका गौरकार यांनी केली आहे.



