आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सर्वांगीण विकास हाच भाजपाचा ध्यास – आमदार देवराव भोंगळे

▪️राजुरा येथील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय , हक्कासाठी लोकाभिमुख कार्य आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच सरकारच्या विकासात्मक योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

राजुरा येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

देशाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांचा धडाका सुरू असून सर्वांगीण विकासाची गॅरंटी केवळ भाजपा सरकारच देऊ शकते असे मत यावेळी आमदार भोंगळे यांनी व्यक्त केले.

आमदार देवराव भोंगळे हे आमदार झाल्यापासून या भागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे आम्ही भाजपचा पर्याय निवडला अशी भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये रवींद्र आत्राम, रुपेश कन्नाके, प्रवीण वाघाडे, कार्तिक मत्ते ,सागर तोरटे यांचा समावेश आहे.

याप्रसंगी गडचिरोलीचे माजी आमदार देवराव होळी, गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, शहराध्यक्ष सुरेश रागीट,महामंत्री सचिन डोहे,शहर महामंत्री सचिन भोयर, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, ग्रामीण महामंत्री सचिन बल्की,उमेश गोरे, अभिजित कोंडावार, राजकुमार डाखरे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.