आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

चिंधीमाल परिसरात दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाचा मुक्त संचार ; नागरिकांनमध्ये दहशतीचे वातावरण

मानव- वन्यजीव संघर्ष शिगेला ; वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी : (इंडिया २४ न्युज) दि.२२ नोव्हें.२०२६
ब्रम्हपुरी वनविभागा अंतर्गत येणाऱ्या चिंधीमाल परिसरातीलच नव्हे, तर ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रांमध्ये गेल्या काही दिवसापासून दिवसाढवळ्या हिस्त्रंवन्यजिवांचा वावर वाढला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले असून, शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटनामुळे या वनविभागाचे परिसरात जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.

ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात दिवसा वाघ, बिबट, अस्वल दिसत असल्याने शेतमजूर कामावर जाण्यास धजावत नाहीत. या वनविभागात यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानीच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. असे असतानाही वाघ, बिबट्या, अस्वल दिसताच अनेक नागरिक कुतूहलापोटी किंवा मोबाईल चित्रीकरण करण्यासाठी हिस्त्रंप्राण्यांचा पाठलाग करत असल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी केलेली गर्दी आणि पाठलाग या हिस्त्रंप्राण्यांना बिथरवणारा ठरत असुन, त्यातून मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.

वन विभागाकडे तातडीच्या उपायोजनाची मागणी:

वाढता धोका लक्षात घेता वन विभागाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनाला लागून असलेल्या गावाच्या संरक्षणासाठी उपाययोजना तात्काळ राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गस्त वाढविणे:
वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमची २४ तास गस्त वाढवून ड्रोन व कॅमेरा ट्रॅप्सच्या सहाय्याने हिस्त्र प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे.

सौर कुंपण :
वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतशिवाराच्या सीमेवर तातडीने सौरऊर्जेवर चालणारे कुंपण उभारावे.

गर्दीवर नियंत्रण :
हिस्त्रंप्राणी दिसल्यास बघ्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी वन कर्मचारी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जमावबंदी करावी आणि हिस्त्रं प्राण्यांचा पाठलाग करणाऱ्यावर कारवाई करावी.

पर्वसुचना यंत्रणा :
हिस्त्रंप्राण्यांचे लोकेशन समजताच गावक-यांना सतर्क करण्यासाठी तात्काळ सुचना देणारी यंत्रणा कार्यान्वीत करावी.

वनविभागाने केवळ बघ्याची भुमीका न घेता, कोणतीही मोठी जिवीतहानी होण्यापुर्वी या हिस्त्रंप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.