▪️हरितालीका ( गौरी) पुजन गौरी मोठ्या उत्साहात..!
▪️गौरी विसर्जनासाठी महीलांची गर्दी..!

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : गौरी शंकराची पुजा करुन अखंड सौभाग्य व पतीचे दिर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात !!!
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथील महिला वैनगंगा नदीतीरावर
हरितालिका गौरी हा स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा सण असुन विशेषत: महाराष्ट्र, गोवा आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये हा सण मोठ्या श्रद्धा-भावनेने आणि उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी महिला गौरी-शंकराची पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात. उपवास, जागरण आणि गौरी-शंकराची कथा ऐकणे ही या सणाची वैशिष्ट्ये आहेत.
स्त्रिया सुंदर रांगोळी काढतात, फुलांनी सजावट करतात, पारंपरिक पोशाख घालून मंगलाष्टक, गाणी म्हणत पूजा करतात.
यामागे देवी पार्वतीने शिवशंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येची कथा सांगितली जाते.
म्हणूनच हरितालिका (गौरी) हा महिलांचा सण मानला जातो आणि तो त्या अत्यंत भक्तीभावाने, आनंदाने व उत्साहात करतात.



