▪️गॅस गोदामात सिलेंडरचा स्फोट ; सहा जखमी..मूल एम. आय. डी. सी. तील घटना..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : गॅस सिलेंडरच्या गोदामात सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना मूल पासुन ३ कि.मी. अंतरावर असलेल्या आकापूर लगतच्या राज्य औद्योगिक विकास वसाहतीच्या परीसरात घडली. सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी गोदामाच्या सुरक्षेशिवाय घटनेविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे.
मूल येथील एच.पी. गँस सिलेंडर विक्रेता संजय फ्लेम एजन्सीचे गडचिरोली मार्गालगतच्या राज्य औद्योगिक विकास वसाहती आकापूर मध्ये सिलेंडरचे गोदाम आहे. घटनेच्या दिवसी एजन्सी मध्ये डिलीव्हरी बाँय म्हणुन काम करणारे श्रीचंद अर्जुनराम बिश्नोई (२०) श्रीराम भगीरथ बिश्नोई (२३), कैलास भगीरथ बिश्नोई (२७) रमेश मोहनराम बिश्नोई (१९) महिंद्रा रामरख बिश्नोई (१९) रतीराम हनुमान बिश्नोई (२५) हे राजस्थान मधील जोधपुर जिल्ह्यातील युवक ग्राहकांना सिलेंडर पोहोचवुन देण्यासाठी वाहणांमध्ये ठेवत असतांना गँस भरलेले सिलेंडर अचानक जमीनीवर पडल्याने स्फोट झाला. त्यामूळे परीसर हादरून गेला. स्फोटात श्रीचंद अर्जुनराम बिश्नोई, श्रीराम भगीरथ बिश्नोई, कैलास भगीरथ बिश्नोई, रमेश मोहनराम बिश्नोई, महिंद्रा रामरतन बिश्नोई, रतीराम हनुमान बिश्नोई ह्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहीती होताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन जखमींना उपचारा करीता तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.स्फोटात सुदैवाने अनुचित घटना झाली नसली तरी घटनेमूळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
ग्राहकांच्या घरांपर्यंत गँस सिलेंडर पोहोचवुन देण्यासाठी सिलेंडर वाहणांमध्ये ठेवत असतांना सिलेंडर जमीनीवर पडल्याने स्फोट झाल्याचे पोलीसांनी सांगितले असले तरी सदर घटना गँस भरलेल्या सिलेंडर मधुन रिकाम्या सिलेंडर मध्ये गँस भरत असतांना घडली. अशी चर्चा आहे. गँस सिलेंडर घरोघरी पोहोचवतांना डिलीव्हरी बाँय अनेकदा वाहणांमधुन सिलेंडर सिमेंटच्या मजबुत मार्गावर फेकत असतात. सिलेंडर जमीनीवर पडुन जर स्फोट झाला असेल तर मग सिलेंडर पोहोचवतांना मजबुत आणि कडक जागेवर गँस भरलेले सिलेंडर फेकल्याने अनेकदा घटना घडल्या असत्या. परंतु अशी कोणतीही घटना शहरात कधीही घडलेली नाही. त्यामूळे स्फोटाच्या कारणाविषयी नागरीकांमध्ये शंका असुन गँस चोरीच्या प्रकारामूळे घटना घडली असावी. याच गोडाऊन मध्ये तीनशेच्या सिलेंडर होते. जर का त्या सिलेंडरला आग लागली असती तर खूप मोठी जीवित हानी झाली असती. असे बोलल्या जात आहे.
स्फोटात जखमी झालेल्यांवर चंद्रपूर येथील डाँ. कुबेर यांचे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलीसांनी घटनेची माहीती एच,पी. गँस कंपनीच्या वरीष्ठांशिवाय स्फोटक तज्ञांना दिली असुन त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत.



