▪️चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत ४९ गणेश मंडळांनी घेतली अधिकृत वीज जोडणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : 28/08/2025 सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत बुधवारी सायंकाळपर्यंत ४९ गणेश मंडळांनी वीज जोडणी घेतल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातून ४५ गणेश मंडळाचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांना कोटेशन देण्यात आले आहे. यात ४२ गणेश मंडळांनी पैसे भरले असून त्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ३ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांना कोटेशन दिले असून विद्युत जोडणी बाकी आहे. तसेच गडचिरोली मंडळात १० गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यात ७ गणेश मंडळांनी पैसे भरले असून त्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे तर ३ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांना कोटेशन दिले असून विद्युत जोडणी बाकी आहे. ही संख्या वाढू शकते असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीज बिलाची रक्कम व वगळून उरलेली रक्कम विना विलंब परत केली जाते.

