ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पारडी – मुरमाडी ते मनेगाव रस्त्याची दुर्दशा तीन महिन्यात रस्त्याला खडे : निकृष्ट बांधकामाचा परिणाम , चौकशीची मागणी..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

मुरमाडी : ( इंडिया 24 न्यूज ) – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार झालेला डांबरी रस्ता तीन महिन्यात रस्त्याला खडे . निकृष्ट बांधकामाची अवघ्या काही दिवसांत दुर्दशा झाल्याचे हे उदाहरण आहे. पारडी – मुरमाडी ते मनेगाव दरम्यान डांबरी रस्त्याचे बांधकाम नुकतेच करण्यात आले आहे . सदर रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले आहेत . तर रस्त्याच्या कडादेखील अनेक ठिकाणी खंडित झालेल्या आहे .

दोन्ही कडांवर मुरूमचा सुलूप टाकण्यात आले नाही . या प्रकारामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे . दरम्यान , या निकृष्ट रस्ता बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुरमाडी व पारडी येथील नागरिकांनी यांनी केली आहे . भंडारा महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पारडी – मुरमाडी ते मानेगाव रस्त्यावर डांबरीकरण केले . सदर रस्ता 6 किलो मीटर लांबीचा आहे . या रस्त्याच्या निविदेची किंमत 2 कोठी 81 लाख रुपये आहे . मात्र , सदर रस्त्याचे बांधकाम करताना बांधकाम विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्या संगणमताने शासकीय निधीची विल्हेवाट लावण्यात आल्याचे दिसून येत असून हा रस्ता निकृष्टपणे बांधण्यात आल्याचे पाहताक्षणीच दिसून येत आहे . रस्त्याचे कंत्राट भंडारा येथील भंडाऱ्याचे कॉन्ट्रॅक्टदार यांना देण्यात आले होते. बांधकाम काळात या कंत्राटदाराविरोधात नागरिकांनी निकृष्ट बांधकामाबद्दल अनेक तक्रारी केल्या . तरी संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणने आहे . विशेष म्हणजे , संबंधित कंत्राटदार कंपनीकडून रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आले असताना रस्त्याच्या दुतर्फा कडांवर अस्तरीकरणासाठी मुरमाच्या ऐवजी खडीमिश्रित मातीचा वापर करण्यात आला आहे . सदर काम निविदेचे तीनतेरा वाजवून केला जात असून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण विकास रस्ते संस्था यांनी बांधकाम सुरू असताना मुंग गिळून बसल्याने हा गैरप्रकार घडला असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे . तीन महिन्यात शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची संगणमताने वाट लावली . या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुरमाडी व पारडी परिसरातील नागरिकांनी केली आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.