▪️पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथील जप्त दारु साठा नाश..
▪️१४.५८ लाख रुपयांच्या जप्त दारु साठयावर फिरवला रोलर पोलीस स्टेशन पोंभुर्णा ची कारवाई..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील पोंभूर्णा पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सह संयुक्तरित्या एक मोठी कारवाई करत, मागील ६ वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल १४ लाख ५८ हजार ५१० रुपये किमतीचा अवैध दारू साठा नष्ट केला आहे. ही कारवाई पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोरील सिमेंट रस्त्यावर रोलर फिरवून करण्यात आली.
पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथील सन २०२० ते सन २०२६ या कालावधीतील एकूण ८५ गुन्ह्यांचा दारू साठा “३९४ पेट्या व ११ किरकोळ देशी दारूच्या बाटल्या, तसेच ०५ पेट्या व ०६ किरकोळ विदेशी दारू” असा एकुण किंमत रुपये १४,५८,५१०/- (चौदा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे दहा रुपये) चा जप्त मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयीन आदेश क्रमांक डिईटी ११२०२५/ज.मु.वि./१३१४/शाखा-३ चंद्रपूर, दि. २०/०५/२०२६ अन्वये या जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश प्राप्त करुन नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क राजुराचे दुय्यम निरीक्षक श्री. एस. टी. धीडसे, व पोलीस स्टॉफ आणि अधिकृत पंचांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. पोलिस स्टेशन समोरील मुख्य सिमेंट रस्त्यावर सर्व दारूच्या बाटल्या ठेवून त्यावर रोड रोलर फिरवून त्या नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर रिकाम्या झालेल्या बाटल्या व काचांचा चुरा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एका मोठ्या खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेचा रीतसर दारू नाश पंचनामा करण्यात आला असून पारदर्शकतेसाठी संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करण्यात आली आहे. तसेच पोंभूर्णा पोलिस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये या कारवाईची रीतसर नोंद करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल श्री सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री राहुल ठेंगणे व पोलीस स्टॉफ यांनी केली आहे.



