आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️येवला नगरपालिका प्रशासनास, सर्व मूलभूत, गरजा प्रलंबित कामांसाठी जाग येणार का ?

▪️कामे होणार का..? अधिकारी तुपाशी जनता उपाशी मुख्याधिकारी, यांनी लेखी आश्वासन दिले उपोषणाची सांगता..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

नाशिक – ( इंडिया 24 न्यूज ) : येवले शहरातील मिल्लत नगर/ ( नांदगावरोड ) रस्त्यालगत, सामाजिक कार्यकर्ते, येवला, ता. आदर्श ज्येष्ठ समाजसेवक, मा. श्री. सुरेशमामा परदेशीं, स्वाभिमानी सेना, नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन सौं. भारतीताई अजय राजपूत, हाजी वसीम शेख, आक्रम अस्लम शेख, जाहिद अस्लम शेख, याकूब मिस्त्री, अय्युब मिस्त्री, निलेशभाई परदेशीं, सलीम सैय्यद, मोबीन मुलतानी, यांच्या घरालगत शेजारच्या बाजूला, गेल्या, 35 – ते – 40 वर्षांपासून, रस्त्यावर सिमेंट करण नाही, गटारीची मोठ्या प्रमाणे दुरावस्था , खड्डेमय रोड, रस्ते, भूमिगत गटार नाही, या ठिकाणी सर्वच नागरिक अंधारात, राहतात, तसेच घाणीचे खूप मोठ्या प्रमाणे, संकटाचे साम्राज्य डासांचे प्रादुर्भाव, आरोग्य धोक्यात आलेले आहेत, तरी येवला न. पा.प्रशासन गेल्या, अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोणतेही मूलभूत सोयी – सुविधा उपलब्ध करून देत नाही, येवले शहरातील, मिल्लत नगर / नांदगावरोड, या भागात, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सर्व कामांना येवले नगरपरिषद येवले हे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे. गटारीची घाण काढण्यासाठी देखील कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे कचऱ्यांचे कायम स्वरूपी दुर्लक्ष ठीक – ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढीगार, पडलेले असून सर्व वयों वृद्ध व लहान मुलांच्या सर्व आरोग्यांची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे, मिल्लतनगर, ( नांदगावरोड ) भागातील सर्व हातपंप नादुरुस्त व. असून तसेच अनेक ठीक – ठिकाणी अंधाराचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरलेले, असून, संपर्क नांदगाव रोड खड्ड्यात गेलेला असून मोठ्या प्रमाणे अपघातात वाढ झालेली आहेत, तरी देखील नगरपालिका प्रशासन व नगर अभियंता, याकडे जाणून बुजून सतत दुर्लक्ष करते, भूमिगत गटारीसाठी ठिक – ठिकाणी सर्व ढाप्यांवर कच्चामाल टाकून अनेक ठिकाणी ढापे तुटून गेलेले आहेत, दररोज कर्मचारी साफसफाईसाठी पूर्णपणे वेळेवर देण्यात यावा, स्वच्छता व सर्व कामांमध्ये होणारी दिरंगाई हालगर्जीपणा यास शासनाने प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पायबंद घालावा होणारा अन्याय / अत्याचार, थांबवावा अशी मागणी या परिसरातील सर्वच त्रस्त नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना. श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब, यांच्या कडे केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.