आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️गुम्मलकोंडा-असरअल्ली पक्का रस्त्याचा प्रस्ताव; भाकपाच्या पाठपुराव्याला यश!

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ
अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असरअल्ली या रस्त्याच्या पक्क्या डांबरीकरणाची मागणी भाकपाने सातत्याने लावून धरली होती.
भाकपाच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, सिरोंचा यांनी हा रस्ता जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत प्रस्तावित करून कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविला आहे.
आता या प्रस्तावाला तात्काळ प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी भाकपाने केली आहे. मंजुरीस विलंब झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार, कॉ. रवी बारसंगडी यांच्यासह भाकपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



