ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. या सामाजिक संघटनेच्या वतीने घोट पोलीस स्टेशन येथे बांधवांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रम संपन्न..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

गडचिरोली / घोट – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी तालुक्यातील पोलीस स्टेशन घोट येथील पोलीसांना बांधवांना रक्षाबंधनाच्या दिवशी घोट पोलीस स्टेशनच्या आवारात माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षा सौ रुम्पा बबलूजी शहा यांच्या नेतृत्वात घोट पोलीस स्टेशन पोलीस बांधवांना भाऊ बंदकीच्या नात्याने राख्या बांधल्या.

माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. तुळशीराम हनुमानजी जांभुळकर साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ शिल्पाताई प्रफुल बनपुरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात नव्यानेच रुजु झालेले सहा पोलीस निरीक्षक मा. कल्पेश खारोडे साहेब पोलीस स्टेशन घोट, बरडे सर मोठ्या संख्येने पोलीस पोलीस बांधव उपस्थित होते. माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना संघटनेच्या गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षा रुप्मा शहा मॅडम, ग्रा.प. सदस्या आशा उपाध्यय, दुर्गा दहाके, वनिता शहा, खुशी माडवगडे, सविता मॅडम, घोट आदिनी महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधून भाऊबंधकीचे नाते दृढ करून आपुलकीचा संदेश दिला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.