आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती आरोपीस ०५ वर्ष कठोर शिक्षा आणि दंड..!

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सकाळी १४/३० वाजेच्या सुमारास आरोपी पतीने, फिर्यादी पत्नीचा चारित्र्यावर संशय घेवुन फिर्यादी आपले हॉस्पीटलचे काम आटपवुन घरी परत येत असताना यातील आरोपीने स्वागत मंगल कार्यालयामागे फिर्यादीस घरी चाल असे म्हटले व फिर्यादीने घरी जाण्यास नकार दिले असता आरोपीने सत्तुर ने फिर्यादीच्या डोक्यावर हातावर व पायावर दोन तिन वेळा वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा फिर्यादीचे बयानावरून व वैद्यकीय अहवाला वरून पोलीस ठाणे ब्रम्हपुरी येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क. ४८/२०२३ कमल ३०७ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्हयाचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थतीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.

मा. न्यायालयचा निकाल : सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. सुधाकर डेगावार यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राहय धरून आरोपीस दिनांक ३१/०८/२०२६ रोजी आरोपीस कलम ३०७ भादवी कायद्यान्वये ०५ वर्ष सक्त कारावास व ५,००० रू दंड, दंड न भरल्यास १ महीण्याचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.

तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेद्रं प्रभाकर उपरे, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी

सरकारी अभियोक्ता अॅड श्री. सुधाकर डेगावार, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अमंलदार प्रकाश शेंदरे ब.न. २२७ पोस्टे ब्रम्हपुरी दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर सदर कामगीरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.