आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून अभिप्राय आमंत्रित..

▪️चंद्रपूर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने सूचना सादर करण्याचे आवाहन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी वाळूगटांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीची (SEAC व SEIAA) अनुमती मिळविण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील वाळूगट निश्चित करण्यात आले असून, उपलब्ध संसाधनांच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल (District Survey Report – DSR) तयार करण्यात आला आहे. या अहवालावर नागरिकांकडून अभिप्राय व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वाळू/रेती उत्खननासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार सदर जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी तसेच त्यावर अभिप्राय (Comments) नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या chanda.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हा सर्वेक्षण अहवालामध्ये जिल्ह्यातील निश्चित करण्यात आलेल्या रेती घाटांची माहिती समाविष्ट आहे. या रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने नागरिकांनी अहवालाचे अवलोकन करून आपल्या सूचना व अभिप्राय नोंदवावेत.

नागरिकांनी आपले अभिप्राय व सूचना खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष सादर कराव्यात किंवा miningofficer.chanda@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.