आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मंत्री चंद्रकिशोर बावनकुळे सा. देण्यात आले यांना निवेदन..

▪️सम्राट अशोक सेनेचे, आकाश दादा शिरसाट यांनी दिला मंत्री यांना निवेदन..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

अमरावती – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय ( डफरीन हॉस्पिटल) मध्ये २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात ( NICU ) पहाटे ३:३० च्या सुमारास अचानक आग लागली.या भीषण आगीत ३ नवजात बाळांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या बालकांना तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आणि दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं निवेदन देण्यात आले. डफरीन रुग्णालय, अमरावती येथील तीन नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आणि नुकसान भरपाई मिळण्याबाबत. या निवेदनाद्वारे अत्यंत दुःखाने व संतापाने निदर्शनास आणून देण्यात येते की, अमरावती येथील शासकीय डफरीन रुग्णालयात तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना घडली आहे.यापूर्वी सुद्धा अशीच घटना घडली होते वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, रुग्णालयातील अस्वच्छता किंवा वेळेवर योग्य उपचार न मिळणे यांमुळे या अनेक चिमुकल्यांचा जीव गेला असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ज्या रुग्णालयात माता आणि नवजात बालकांना जीवनदान मिळायला हवे, तिथेच शासकीय अनास्थेमुळे तीन निष्पाप चिमुकल्यांचे प्राण जाणे ही अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेमुळे मृत बालकांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण महाराष्ट्रभर अमरावती जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमच्या खालील प्रमुख मागण्या आहेत.

उच्चस्तरीय चौकशी: या संपूर्ण घटनेची तात्काळ निष्पक्ष व उच्चस्तरीय वैद्यकीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई: या घटनेस जबाबदार असणारे संबंधित डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा किंवा निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे.

आर्थिक मदत: मृत बालकांच्या पीडित पालकांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत प्रदान करण्यात यावी.

रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा: डफरीन रुग्णालयातील नवजात बाल संगोपन विभागातील (SNCU/NICU) सोयी-सुविधांची तात्काळ पाहणी करून तेथील अस्वच्छता व अपुऱ्या सुविधा दूर करण्यात याव्यात, जेणेकरून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.
जर या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही,तर सम्राट अशोक सेना,महाराष्ट्र राज्य च्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
आशा आहे की, आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित कुटुंबांना न्याय मिळवून द्याल. हीच आमची विनंती नाहीतर या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.