आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अल्पवयीन बालिकेवरील लैगिंक अत्याचार प्रकरणात आरोपीस पोक्सो कायद्या अतंर्गत १० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ०३/०६/२०२२ रोजी सांयकाळी ०४/०० वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी कामावरून घरी परत आले असता, मुलगी घरी दिसुन न आल्याने विचारपुस केली असता मुलगी बाहेर खेळण्याकरीता गेली असल्याची माहीती झाल्याने, फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यानी शोधा शोध केली असता आरोपीचे घराजवळ लहान मुलीचा आवाज आल्यासारखे वाटलयाने आरोपीचे घरी जावुन पाहीले असता आरोपी हा अल्पवयीन मुलीला घरातील पंलगावर झोपवुन अत्याचार (लैगींक कृत्य) करताना दिसुन आल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून तसेच मेडीकल रिपोर्ट वरून पोलीस ठाणे रामनगर येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क. ६११/२०२२ कमल ३७६ (एबी), ५०६ भादवी सह ४,६ पोक्सो कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्हयाचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थतीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.

मा. न्यायालयचा निकाल – सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. एस. आर. डेगावार यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राहय धरून आरोपीस दिनांक ०५/०९/२०२६ रोजी आरोपीस कलम ३७६ (एबी) भादवी सह ४,६ पोक्सो कायद्यान्वये १० वर्ष सश्रम कारावास व १,००० रू दंड दंड न भरल्यास १ महीण्याचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.

तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी – तपासी अधिकारी महीला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजुरकर पोलीस स्टेशन रामनगर

सरकारी अभियोक्ता श्री. एस. आर. डेगावार – कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनी शामराव पोईनकरे, पोस्टे रामनगर

दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर – सदर कामगीरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.