◼️सिंदेवाही पोलीसातर्फे बैठक शांतता बैठक संपन्न; गणेशोत्सवात जनजागृती करणाऱ्या मंडळाना विशेष पुरस्कार!

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙂 २४न्यूज )दि. ७सप्टेंबर आगामी सण – उत्सव शांततेत सुरक्षित आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पाडावे तसेच समाजात महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत दिनांक ७ सप्टेंबर २०२6 रोजी सकाळी ११. ३० ते दुपारी २. ०० वाजेपर्यंत शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
आगामी गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी श्री झरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
▪️ बैठकीतील प्रमुख उपस्थिती :
या बैठकीस नायब तहसीलदार सिंदेवाही श्री सायरे, एम एस ई बी चे अधिकारी, नगरपंचायतीचे अधिकारी, नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोंधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, भाजप तालुकाध्यक्ष नागराज गेडाम तसेच जिल्हा शांतता कमिटीतील सदस्य, पत्रकार बंधू, जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील, डी जे चालक-मालक आणि जवळपास ४५० ते ५०० गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
▪️महत्वाचे निर्णय व विशेष मोहीम :
उत्कृष्ट देखाव्यांना पुरस्कार :
यंदाच्या गणेशोत्सवात अमली पदार्थ विरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि महिला सुरक्षा या विषयावर उत्कृष्ट देखावे, जिवंत झाकी किंवा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
डीजे बाबत कडक नियम :
डीजेच्या बाबतीत “दोन टॉॅप, दोन बेस अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलीस स्टेशन सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी ही शांतता समिती आयोजित केली होती. बैठकीच्या यशस्वीतेसाठी गोपनीय पोलीस कमलेश फेंडर, नपोअ नारायण येगेवार तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



