आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आगामी सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हयात लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध..

▪️पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हयामध्ये आगामी काळात पोळा, तान्हा पोळा, गणेशात्सव आणि विसर्जन असे विविध धार्मीक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. दिनांक ०५/०९/२०२६ (रात्री २०.०० वा.) ते २७/०९/२०२६ ( रात्री २४.०० वा) या कालावधीत सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ आणि कलम ३८ (१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.

प्रमुख निर्बंध व नियम : लेझर लाईटवर पुर्ण बंदी (कलम ३६ अन्वये मिरवणुकीदरम्यान Lazer Light, तीव्र तीव्रतेचे Flash Light व मानवी डोळयांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधीकारी / सक्षम प्राधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करु शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश देतील.

ध्वनिवर्धक व DJ वापराबाबतचे नियम (कलम ३८ (१) अन्वये): – लेखी परवानगी अनिवार्य: सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाउडस्पिकर, अॅम्प्लीफायर वापर करता येणार नाही.

डी.जे. व मॉडीफाईड साउंड सिस्टीमवर बंदी: डी जे, प्लाइमा सिस्टीम, मॉडीफाईड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर, यांसारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहील.

शांतता क्षेत्र : रुग्नालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांसारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुर्ण बंदी रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डी जे वापरण्यास सक्त मनाई राहील (जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस / वेळ वगळून)

परिसरनिहाय ध्वनी तीव्रता मर्यादा (डेसिबल – db): क्षेत्र कोड : क्षेत्राचा/विभागाचा प्रकार : दिवसा मर्यादा, रात्री मर्यादा
A औद्योगिक क्षेत्र : ▪️७५ db, ७० db
B व्यावसायीक क्षेत्र : ▪️६५ db, ▪️५५ db
C निवासी क्षेत्र : ▪️५५ db, ▪️४५ db,
Dशांतता क्षेत्र (सायलंस झोन)
▪️५० db, ▪️४० db

नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई : साहित्य जप्ती व कायदेशीर कारवाई नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ७० अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा / उपकरणे जप्त केली जातील.

अटक व खटला – आयोजक, ऑपरेटर किंवा वाहन चालक विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटक केली जाऊ शकते तसेच कलम १३४, १३६ अन्वये न्यायालयात खटला दाखल केला जाईल

चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, उत्सव मंडळे व आयोजकांना शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.