आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चामोर्शी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली / चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील वाघोली शिवारात डोक्यात धारदार हत्याराने वार करून एका ३४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता चामोर्शी ते मूल मार्गावरील रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर मौजा वाघोली शिवारात ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने नंदकिशोर मिश्रा यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मृतकाचे नाव नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (वय ३४), रा. तेली मोहल्ला, वार्ड क्र. ५, श्रीराम मंदिराजवळ, मूल, जि. चंद्रपूर असे निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी वर्णन जाहीर केले होते – अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी पॅन्ट, गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ आणि पायात पॅरागॉन कंपनीची प्लास्टिक चप्पल होती. आज मृताचे नातेवाईक चामोर्शी येथे दाखल झाले आणि ओळख पटली.

पुढील तपास : हत्येमागील कारण, आरोपीची ओळख आणि खुनामागील नेमके रहस्य उलगडण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.