आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्हयातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी निंयत्रण कायदा १९९९ MCOCA अंतर्गत कारवाई…

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हयातील राजुरा शहरात भरदिवसा गोळ्या झाडून घडवून आणलेल्या खळबळजनक हत्याकांडातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध राजुरा पोलिसांनी धडक पाऊल उचलले आहे. पोलीस ठाणे राजुरा अंतर्गत पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999’ (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक 24/08/2026 रोजी सायंकाळी 05:30 ते 06:00 वाजेदरम्यान सोमनाथपूर वार्ड, राजुरा येथील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव हे कोर्टासमोरील किरणकुमार साईला यांच्या नारळ पाण्याच्या दुकानाजवळ मित्रांसोबत बसलेले होते. त्यावेळी इंदिरानगर, राजुरा येथील आरोपी करण दुर्गराज मेकलवार व करण दिपक बावीस्कर यांनी तोंडाला दुपट्टा बांधून दुचाकीने तेथे प्रवेश केला. यातील आरोपी करण दिपक बावीस्कर याने स्वतःजवळील अग्नीशस्त्रातून (पिस्तूल) विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची निघृण हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलीस ठाणे राजुरा येथे अप. क्र. 695/2026, कलम 103(1), 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) सहकलम 3, 25, 27 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा प्राथमिक तपासात, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वेगाने तपास चक्रे फिरवून पूर्ण केला. तपासादरम्यान प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त गुन्ह्याचा कट रचणारे, अपप्रेरणा देणारे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे आरोपी परवेज सरवर शेख, कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खामनकर यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण 3 अग्नीशस्त्रे, 3 रिकाम्या मॅग्झिन व 6 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

मोक्का (MCOCA) कारवाई
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीची संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला मंजुरी देत मा. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) 1999 चे कलम लागू करण्यास रीतसर परवानगी दिली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधीक्षक श्री कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.नितीन चिंचोळकर, पोउपनि सुरेंद्र उपरे व पोहवा कैलास आलाम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.