आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️आनंदवन येथे कृषी कन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

आनंदवन,वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारा संलग्न आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कार्यानुभव विषयाअंतर्गत आनंदवन येथील शेतकऱ्यांना १८ ऑगस्ट रोजी फवारणी करतांना कीटचा वापर करावा याबद्दल मार्गदर्शन केले तसेच सुरक्षा किटचे फायदे सांगितले. काळजीपूर्वक
व्यवस्थापनाचे महत्व व रासायनिक औषध फवारणी करताना शरीराचे संरक्षण होणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. या प्रात्यक्षिकामध्ये वैभवी गांजरे, मृणाली गरपडे, नंदिनी काठोके, जागृती राऊत, तृप्ती काचोळे, रेणुका पाटील या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई, विषय विशेषज्ञ श्री. एन. डी. गजबे,कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. इमडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.