आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️जवखेडे खालसा येथे नागपंचमीच्या हरिणाम सप्ताहात महिलांचा जंगी हंगामा?

संपादक – शिल्पा बनपूरकर

अहमदनगर – ( इंडिया 24 न्यूज ) नागपंचमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे मात्र भैरवनाथ मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहातच महिलांचा जंगी हंगामा झाला. संपूर्ण गावाचे आराध्य दैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरात १७ ते २१या काळात अखंड हरिणाम सप्ताहाचे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.प्रतिक्षा कासार,पांडुरंग चव्हाण, हौसराव मगर,भगवान मचे यांची किर्तने झाली. शेवटी ह.भ.प.गोविंद महाराज गोरे (आळंदी)यांचे काल्याचे किर्तन झाले. नंतर गावातील युवा नेते अमोल अच्युतराव वाघ यांची महाप्रसादाची पंगतही झाली.आणि दुपारी गावठाणात चक्क महिलांचा जंगी हंगामा झाला. मध्यस्थी पंच म्हणून जेष्ठ पैलवान उत्तमराव आंधळे आणि विठ्ठलराव लांघे यांनी कुस्त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. येवला,वैजापूर, संभाजी नगर,करंजी आणि जिल्ह्यातील इतरही नामवंत मल्लांनी हजेरी लावली. मोनिका आंधळे, गौरी मुखेकर,कल्याणी रजपूत, गीता वाघ,राजकन्या, शिवकन्या जामखेडकर या महिला पैलवानांनी कुस्त्यांचा जंगी हंगामा करीत मैदान गाजवले. तसेच पुरुष पैलवान पोपट लांघे,अमोल लांघे, नामदेव आंधळे, सागर लांघे,लक्ष्मण लाघे, यांनी ही नामांकित कुस्त्या करून गावाचे नाव उंचावले.या महीलांच्या कुस्त्यांचा हंगामा भरविण्यासाठी राजेंद्र ढाकणे, बलभिमराव वाघ,भिवसेन वाघ,नवनाथ लांघे, प्रकाश वाघ,गोटीराम आंधळे, बद्रीनाथ सरगड,रमेश आंधळे, मच्छिंद्र लांघे सर,वैभव आंधळे,अमोल वाघ यांनी विषेश परिश्रम घेतले.सुत्रसंचालन छगन पानसरे सर यांनी केले. सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि तोफांच्या सलामीत भैरवनाथाची सवाद्य पालखी मिरवणूक ही काढण्यात आली होती. नागपंचमीचा सण उत्साहात आणि शांततेत पार पडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.