आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️नांदगाव पोडे येथील शेतजमीन भूमिगत कोळसा खाणीला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध..!

▪️नांदगाव (पोडे)ग्रामपंचायत मार्फत आयोजित ग्रामसभामध्ये "ठराव "एक मताने पारित..!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

बल्लारशा – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 21 ऑगस्ट रोजी विसापूर नांदगाव हद्दीतील असलेल्या शेतशिवार मध्ये सनफ्लॅक आयरन कोल स्टील लिमिटेड कंपनी-ला केंद्र सरकारनि 802 हेक्टर शेत- जमीन मायनिंग खान करिता दिले आहेत. त्यामध्ये जवळपास 2000 ऐकर शेत जमीन आहेत 2000 ऐकर म्हणून मधून फक्त 30 ऐकर शेतजमीम कंपनी घेणार आणि भूमिगत खदान करणार असे निदर्शनास आले म्हणून नांदगाव पोडे व विसापूर गाव-मधील येथील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे हे सुद्धा दिसून आले.

भिवकुंड या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करून खाजगी कंपनी स्वताच्या मर्जीने मनमानी करून शेतकऱ्यांचे नुकसान होईल असे जुलमी धोरण लादण्याचा प्रयत्न करीत आहेत व दलाला मार्फत जमिनी घेऊन शेतकऱ्यांची दिशा भुल करण्याचे कार्य केल्या जात आहेत. या-संदर्भात गावतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुचाना न देता परस्पर पत्र गहाळ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्या गेली होती.या विरोधात मिशन ग्रामसेवा द्वारे ग्रामपंचायत ला निवेदन देऊन ग्रामसभा घेऊन या कंपनीच्या चुकीच्या धोरण विरोधात ठराव मंजूर करून घेण्यात आला. तसेच ठराव मध्ये भूमिगत खानिला विरोध करण्यात आले व जर (opencaste) खदान होईल तर शेतकरी पुढील विचार करणार तसेच (भूमिगत) खदान विरोधात संबंधित विभागला पत्र देण्यात येईल असे सुद्धा ठरवण्यात आले व ग्रामसेवा समिती मार्फत सुनील खापने,सूर्या अडबाले, देवा शेंडे संदीप उरकुडे, प्रदीप गेडाम, प्रीतम पाटणकर, राज वर्मा,शैलेश लांबट, गणेश लांबट, प्रशांत धोटे, किशोर गाडगे, कैलाश शेंडे, लहू चीकाटे,आकाश हस्ते, सुनील मिटल्लीवर, निखिल निमकर, सुहास वणकर यांनी परिश्रम केले.यासाठी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संखेने ग्रामसभा-मध्ये उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.