आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे. – जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे : दिनांक 23 ऑगस्ट, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली असून जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही जपत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करुन सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून मताधिकार बजावण्यासाठी मतदान नोंदणी, मताधिकारी, लोकशाहीचे सक्षमीकरण या विषयांवर प्रबोधन करतात तसेच सजावटीद्वारे सामाजिक संदेश देखील दिले जातात.

▪️असे आहेत स्पर्धेसाठी विषय..

✅ लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही.
✅ मतदान यादीतला तरुणाईचा टक्का वाढवा म्हणून.
✅ आम्ही मतदान करणार कारण.
✅ हक्क वंचितांचे, मार्ग मताधिकाराचा.
✅ शहरी मतदारांची अनास्था- कारणे आणि उपाय.

वरील विषय सोईसाठी असून या विषयापलीकडेही जाऊन स्पर्धेकांना देखाव्यातून संदेश देता येईल. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदान नोंदणी, मताधिकार यांचे महत्व अधोरेखित झाले पाहिजे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल. यासारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येणार आहे.

✅ *बक्षिसांचे स्वरूप*

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख रुपये, द्वितीय 51 हजार रुपये, तृतीय 21 हजार असून उत्तेजनार्थ 10 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे असणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज व नियमावली सप्टेंबर मध्ये कळविण्यात येईल. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.