आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी सीताबाई आर्ट्स महाविद्यालय अकोला येथे सभेचे आयोजन..

▪️शिक्षक आमदार श्री किरण सरनाईक यांचे सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन..

संपादक – शिल्पा बनपूरकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 23: दिनांक 25 / 8 /2023 रोज शुक्रवार ला सीताबाई आर्ट्स महाविद्यालय अकोला येथे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक तथा कार्यालयीन समस्या निवारणासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), वेतन पथक अधीक्षक, लेखाधिकारी यांच्या समवेत व अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार मा. श्री किरण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन केलेले आहे. ही सभा दुपारी ठीक 1.00 वाजता आयोजित केलेली आहे. तरी अकोला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींना नम्र विनंती तथा आवाहन करण्यात येते की, आपल्या काहीही शैक्षणिक समस्या तसेच कार्यालयीन स्तरावर प्रलंबित समस्या असल्यास आपण निवेदनासह या सभेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती असे प्रसिद्दीपत्रकाद्वारे समाजसेवक गजानन हरणे यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.