▪️आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मला प्रोत्साहन दिले ; खूप खूप आभार

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर : देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी उपक्रमाच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात उर्दू भाषेत श्रीमद्भगवद्गीतेचा अनुवाद करणाऱ्या फातिमा बहन यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भगवद्गीतेचा उर्दू भाषेत अनुवाद करण्याच्या कार्यात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना माझा धर्म पाहिला, ना राज्य. त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहून माझ्या कलागुणांना पाठबळ दिले.” फातिमा बहन यांनी व्यक्त केलेले हे कृतज्ञतेचे शब्द सुधीरभाऊंच्या सर्वसमावेशक आणि संवेदनशील नेतृत्वाची साक्ष देतात.
भाषा वेगळी असू शकते, धर्म वेगळा असू शकतो; पण माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सद्भावनेची मूल्ये सर्वांनाच जोडतात, हा फातिमा बहन यांनी दिलेला संदेश मनाला भिडणारा आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माणसातील गुणांचा सन्मान करण्याचा आदर्श घालून दिला आहे. माणुसकीला प्राधान्य देणारा हा विचारच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळ देतो.


