आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️माझ्या पद्मश्रीचे संपूर्ण श्रेय सुधीरभाऊंना; हा सन्मान माझा नाही, तर संपूर्ण झाडीपट्टीचा! -पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची कृतज्ञ भावना..

▪️पाच दशकांच्या नाट्यसेवेचा गौरव; सुधीरभाऊंनी माझ्या कलेला राष्ट्रीय सन्मानापर्यंत पोहोचवले..

संपादिका सौ शिल्पाताई बनपुरकर

चंद्रपूर – मी गेली ५० वर्षे झाडीपट्टीच्या नाट्य क्षेत्रात काम करत आहे. आयुष्याची पाच दशके रंगभूमीला समर्पित केली. या प्रवासात मोठा संघर्ष केला, अनेक अडचणींचा सामना केला; मात्र माझ्या कलेमागील वेदना आणि झाडीपट्टीच्या लोकनाट्य परंपरेचे महत्त्व जाणून घेणारे नेतृत्व मला सुधीरभाऊंच्या रूपाने लाभले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना माझ्या कलेची दखल घेतली. माझी फाईल पुढे पाठवली आणि माझ्या कलासाधनेला पद्मश्रीसारखा राष्ट्रीय सन्मान मिळण्याच्या प्रवासात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे मला मिळालेला पद्मश्री सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण झाडीपट्टीचा आहे. या सन्मानाचे संपूर्ण श्रेय माझ्या सुधीरभाऊंना जाते, या शब्दांत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मन की बातच्या १२ वर्ष पूर्ती निमित्त आयोजित चंद्रपुरातील प्रियदर्शनी सभागृहात येथे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

गेली पाच दशके झाडीपट्टीच्या नाट्य परंपरेची सेवा करत लोककलेचा वारसा जपणारे डॉ. परशुराम खुणे यांच्या या भावना केवळ एका व्यक्तीच्या कृतज्ञतेच्या नाहीत, तर कलावंतांच्या संघर्षाची जाणीव ठेवणाऱ्या आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नेतृत्वाविषयीच्या विश्वासाचे प्रतीक आहेत. रंगभूमीवर आयुष्य वेचणाऱ्या कलावंताच्या साधनेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळणे, हा त्या कलावंतासोबतच संपूर्ण झाडीपट्टीच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे, अशी भावना त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाली.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयी बोलताना पद्मश्री डॉ. खुणे म्हणाले की, सुधीरभाऊ हे केवळ राजकारण करणारे नेते नाहीत, तर जनतेच्या सुख-दुःखाशी नाते जोडणारे लोकनेते आहेत. शेतकरी, कलावंत, कष्टकरी आणि कामगार यांच्या प्रश्नांना ते तितक्याच ताकदीने वाचा फोडतात. सामान्य माणसाची अडचण असो किंवा एखाद्या क्षेत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न असो, तो प्रश्न मार्गी लागावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. जनतेच्या समस्यांनी अस्वस्थ होणारे, अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणारे आणि संकटात सापडलेल्या माणसाला आधार देणारे नेतृत्व म्हणून सुधीरभाऊंची विशेष ओळख आहे.

आयुष्यात अनेक माणसे भेटतात; पण आपल्या कर्तृत्वाला ओळख देणारी, आपल्या संघर्षाला प्रतिष्ठा मिळवून देणारी आणि कठीण प्रसंगी पाठीशी उभी राहणारी माणसे फार दुर्मीळ असतात. सुधीरभाऊंसारखा माणूस आपल्या जवळ असणे, हीच मोठी ताकद आहे,असे भावुक उद्गारही पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी काढले.

पाच दशकांपासून झाडीपट्टीच्या नाट्यरंगभूमीची सेवा करणाऱ्या पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या भावना, कलावंतांच्या कलेची जाण ठेवणारे, त्यांच्या संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाला सन्मानाची उंची मिळवून देण्यासाठी आधार देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची साक्ष देतात. कलावंतांच्या सुख-दुःखाशी नाते जोडून त्यांच्या कलेचा गौरव करणारे सुधीरभाऊ म्हणजे कलावंतांसाठी विश्वासाचा आधार आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणारे नेतृत्व आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.