आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांची विविध मतदान केंद्रांना भेट..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली – आज नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, गडचिरोली शहरातील विविध मतदान केंद्रांवर महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध मतदान केंद्रांवर उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मतदारांशी संवाद साधला. मतदान केंद्रांवरील व्यवस्थेची पाहणी करून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे की नाही, याची माहिती त्यांनी घेतली.

पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा असून, सुशिक्षित पदवीधर मतदारांनी आपल्या मताचा योग्य वापर करून लोकशाही अधिक बळकट करावी, असे महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील विविध मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, समशेरखान पठाण, प्रभाकरजी वासेकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, दिवाकर निसार,नरेंद्र भोयर, लीना मॅडम पठाण, महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर,संध्याताई उईके, रीताताई गोवर्धन, शालिनीताई पेंदाम, मीनलताई चमुरकर,उत्तम ठाकरे, उईके सर,योगेंद्र जंजाळ, महेंद्र लटारे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.