आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️खाजगी शाळांमधील मनमानी लेट फी तात्काळ बंद करा; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन करणार!

▪️शैक्षणिक शुल्क उशिरा भरल्यास पालकांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी विलंब शुल्काबाबत मनसेची भूमिका..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील काही खाजगी शाळांमध्ये शैक्षणिक शुल्क उशिरा भरल्यास पालकांकडून लेट फीच्या नावाखाली आकारण्यात येणाऱ्या अवाजवी शुल्काबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या शुल्क आकारणीची योग्य तपासणी करून पालकांवर होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी संबंधित शिक्षण विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आजच्या महागाईच्या काळात अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करून शाळेचे शुल्क भरत असतात. मात्र, काही कारणांमुळे शुल्क भरण्यास उशीर झाल्यास पालकांकडून अतिरिक्त लेट फी आकारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा महत्त्वाचा हक्क असून, शुल्क भरण्यास झालेल्या विलंबाच्या कारणावरून पालकांना अनावश्यक आर्थिक त्रास होऊ नये.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांकडून आकारण्यात येणाऱ्या विलंब शुल्काची तपासणी करावी, शाळांनी शुल्क आकारणीचे नियम व अटी पालकांसमोर स्पष्ट कराव्यात आणि लागू नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

कुलदीप चंदनखेडे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत :1. खाजगी शाळांमधील मनमानी व अवाजवी लेट फी आकारणीच्या तक्रारींची तातडीने चौकशी करावी.
2. लागू नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क तात्काळ थांबवावे.
3. शाळांनी विलंब शुल्काबाबतचे नियम, अटी व शुल्क आकारणीचा तपशील पालकांना स्पष्टपणे कळवावा.
4. चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त शुल्क आकारले असल्याचे आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करावी.
5. पालकांना तक्रार नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

या प्रकरणाकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन पालकांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि पालकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. मनमानी शुल्क आकारणीबाबत योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांनी दिला आहे.य या वेडी उपस्तीत असनारे किशोर मडगुलवार जिल्हा सचिव रमेश काडबांदे जिल्हा अध्यक्ष जनहित प्रविन शेवते तालुका उपाध्यक्ष शुंभम वांढरे शहर उपाध्यक्ष फिरोज पठाण असे मनसैनिक उपस्तीत होते

कुलदीप चंदनखेडे
जिल्हा उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, चंद्रपूर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.