▪️राजुरा पोलीस ठाण्यांतर्गत दिड वर्षानंतर अकस्मात मुत्यु (मर्ग) चौकशी दरम्यान खुनाचा (मर्डर) गुन्हा उघडकिस..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन राजुरा येथे दिनांक 20/05/2025 रोजी 01/00 वा ते 01/30 वा दरम्यान चार्ली शेतशिवार ता राजुरा जि चंद्रपूर येथे शंकर परशुराम काळे वय 60 वर्ष यांच्या बाबत घटना घडली होती सुरुवातील या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यु प्रकरण क्र 44/2025 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाणे मर्ग दाखल करुन चौकशी सुरु करण्यात आली होती. सदर अकस्मात मुत्यु प्रकरणाच्या मर्ग चौकशीदरम्यान मयताच्या शवविच्छेदन अंतिम अहवाल वरुन मुत्यु हा आत्महत्येने नसुनगळा दाबल्यामुळे (HYOID BONE FRACTURE) झाला असल्यामुळे निष्पण झाले तसेच सुरुवातील मयताचा मुलगा याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची खोटी माहिती व बनाव रचुन पोलीसांची दिशाभुल केल्या वरुन .
सदर मर्ग चौकशी दरम्यान मुत्युकाचा मुलगा नामे निखील शंकर काळे वय 31 वर्ष रा. धिडसी ता राजुरा जि चंद्रपूर याच्या कडे परत चौकशी व सखोल विचापुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने चौकशी निष्पण झाल्याने.
दिनांक 29/10/2026 रोजी मर्ग चौकशीअंतीम वैद्यकिय अहवाल आणि पुराव्यांच्या आधारे हि आत्महत्या नसुन खुन असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलीस निरिक्षक नितीन चिंचोळकर यांच्या फिर्यादीवरुन पो. स्टे राजुरा येथे अप क्र 804/2026 कलम 109 (1) 240 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी सा चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपुर मा.. सहाय्यक पोलीस अधिक्षक सा श्री. कूमार सुंशात सा राजुरा राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर, यांचे नेतृत्वाखाली सपोनी योगेश पाटील व पोस्टॉफ यांनी केली आहे. व पुढील तपास सपोनि योगेश पाटील हे करीत आहे.


