आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या दोन सराईत ईसमावर गोंडपिपरी पोलीसांची मोठी कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपार..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

गोंडपिपरी – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याचे उ‌द्देशाने पोलीसांनी दोन कुख्यात व सराईत ईसमाविरुद्ध हद्दपारीची धडक कारवाई केली आहे.

सराईत गुन्हेगार अशफाक मस्तान कुरेशी वय ४३ वर्ष रा. गोंडपिपरी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर याचेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव पोलीस स्टेशन गोंडपिपरी कडुन उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांचेकडे सादर करन्यात आला होता. प्राप्त प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांनी सबंधित ईसमाविरुद्ध सबंधित ईसमाविरूद्ध ०६ महीन्याचे कालावधिसाठी हद्द‌पारीचा आदेश पारीत केला असुन गोंडपिपरी पोलीसांनी सदर आदेश बजावुन कायदेशीर कारवाई पुर्ण केली आहे.

सराईत गुन्हेगार सुंदरसिंग उर्फ सुलविंदरसिंग तेजासिंग डांगी वय २३ वर्ष रा. जोगापूर ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर याचेविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव पोलीस स्टेशन गोंडपिपरी कडुन उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांचेकडे सादर करन्यात आला होता प्राप्त प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांनी सबंधित ईसमाविरुद्ध ०६ महीन्याचे कालावधिसाठी ह‌द्द‌पारीचा आदेश पारीत केला असुन गोंडपिपरी पोलीसांनी सदर आदेश बजावुन कायदेशीर कारवाई पुर्ण केली आहे.

पोलीस प्रशासनाचा सज्जड इशारा

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाकडुन अत्यंत प्रभावी व कठोर कायदेशीर कारवाई करन्यात आली आहे. या कारवाईमुळे परीसरातील समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत. या पुढील काळातही अशा प्रकारच्या समाज विघातक कारवाया करना-यांनी अत्यंत सतर्क राहावे अन्यथा पोलीस प्रशासनाकडुन यापेक्षाही अधिक कठोर आणि जडजोडहीन कारवाई केली जाईल असा सज्जड ईशारा पोलीस स्टेशन गोंडपिपरीच्या वतीने देण्यात येत आहे. सामान्य नागरीकांच्या सुरक्षेसाठी व शांतता टिकविण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटीबद्ध आहे.

सदरची धडक कारवाई श्री आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, श्री सत्यजीत आमले उपविभागीय पोलीस अधिकारी सामुल यांचे मार्गदर्शनात पार पाडण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.