आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️एटीएम मधून कमी आलेले पैसे परत करण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगाल मधील सायबर भामट्याला कोलकाता येथून अटक..

▪️ ठोकल्या बेड्या.. न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : बँक कर्मचारी असल्याचे भासवून मोबाईलवर बनावट एपीके (APK) फाईल पाठवून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत ५ लाख ४३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर भामट्याला सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर च्या विशेष पथकाने पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथून

मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने आज त्यास न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यातील फिर्यादी 58 वर्षीय शालेय मुख्याधिपीका यांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून ५,००० रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता एटीएममधून ९०० रुपये कमी आले. याबाबत त्यांनी बँकेत रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर फिर्यादी यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला व समोरच्या व्यक्तीने बँक कर्मचारी असल्याचे भासवून “तुमच्या एटीएममधून ९०० रुपये कमी आले आहेत का?” अशी विचारणा केली व फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक बनावट APK अॅप्लिकेशन पाठवून ते डाऊनलोड करण्यास लावले आणि त्यामध्ये बँकेचा एटीएम पिन व सीव्हीव्ही (CVV) माहिती भरण्यास लावून विविध ऑनलाईन ट्रान्सॅक्शनद्वारे खात्यातील ५,४३,०००/- रुपये परस्पर वळवून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे अपराध क्र. ००६/२०२६ नुसार कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३ (५) बीएनएस (BNS) २०२३ सह कलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

कोलकाता येथे ४ दिवस-रात्र शोधमोहीम व न्यायालयीन कोठडी:

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांनी सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश गिरी, पोलीस अंमलदार राहुल पोंदे, अनिमेश भोंगळे व पंकज बावणे यांच्या विशेष पथकास पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग ४ दिवस-रात्र कसोशीने शोध घेतला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी अंगद सुरज प्रजापती, वय २१ वर्षे, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल यास उल्डाडांगा पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर आरोपीस चंद्रपूर येथे आणून त्याची ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. कोठडीदरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन सखोल विचारपूस करण्यात आली असून त्याचे इतर साथीदार आणि गुन्ह्याच्या संपूर्ण नेटवर्कबाबत माहिती घेऊन पुढील तपास सुरू आहे. आज दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपीची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
तपास पथक व कामगिरीः

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपणी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुनिल गाडे यांच्या नेतृत्वातः

विशेष तपास व अटक पथकः सपोनि श्री निलेश गिरी, पोअं राहुल पोंदे, अनिमेश भोंगळे, पंकज बावणे.

सहकारी अधिकारी व अंमलदारः सपोनि राजेंद्र सोनवणे, सपोनि अनिसा सय्यद, सपोउपनि मुजावर अली, पोहवा कार्तिक खनके, उमेश रोडे, पोअं गुणवंत मुंडके, साहिल आवारी, मपोअं छाया शंभरकर, पुजा जांभुळे, अंजली घिवे, श्रुतीका घाईत (सर्व सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहनः बँक अधिकारी अथवा कर्मचारी कधीही फोनवर गोपनीय माहिती मागत नाहीत किंवा अनोळखी लिंक पाठवत नाहीत.

अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅप अथवा मेसेजवर पाठवलेली कोणतीही APK फाईल डाऊनलोड करू नका.

एटीएम पिन, ओटीप, सीव्हीव्ही नंबर कोणाशीही शेअर करू नका. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.