▪️ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी “दिवाळीचे पुर्व संधेला” मा. पो.नि. कांचन प. पांडे सो. यांचे हस्ते परत..
▪️मुळ मोबाईल मालकांना मोबाईल परत..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
ब्रह्मपुरी – ( इंडिया 24 न्युज ) : ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथे प्राप्त मोबाईल मिसींगच्या तक्रारीचा CEIR Portal च्या माध्यमातुन ब्रम्हपुरी पोलीस ठाणे पोस्टे परीसर व आजुबाजुचे परिसरात मिसींग मोबाईलचा शोध घेतला असता एकुन ४२ मोबाईल मिळुण आल्याने सदरचे मोबाईल हे मोबाईल चे मुळ मालक यांना दिवाळीचे पुर्व संधेला मा. पो.नि. श्री. कांचन प. पांडे सो. यांचे हस्ते परत देण्यात आले. मोबाईलचे मुळ मालक यांना त्यांचे हरविलेले मोबाईल प्राप्त झाल्याने त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाणेचे आभार व्यक्त केले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी सो., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी श्री. साहील झरकर सो, पोलीस निरीक्षक श्री. कांचन प. पांडे सो यांचे मार्गर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथक चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे सो. पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलींद नैताम, पोलीस अंमलदार प्रविन भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार, वशिष्ट रंगारी यांनी मौलाची भुमीका बजावली आहे.


