▪️डोंगरगाव सिंचन प्रकपाच्या कालव्यात ” रुपेश कुलसंगे, यांचा पाण्यात बुडून मृत्यू.
▪️दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक..
*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*
विरुर – ( इंडिया 24 न्यूज ) : डोंगरगाव चींचाळा सिंचन प्रकल्प येथे चार तरूण पार्टी करण्यासाठी गेले होते.या दरम्यान त्यांनी ड्यामच्या कालव्यात पोहायला गेले होते. त्या पैकी दोन मुलं ड्यामच्या कालव्यात बुडले होते. त्यापैकी एका मुलाला बाहेर काढण्यासाठी त्यांक्या साथीदाराना यश मिळाले. मात्र दोघांपैकी रुपेश खंडेराव कुळसंगे ( वय 23 ) या यूवकाचा पाण्यात बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रुपेश यांचा 5 महिन्यापूर्वी लग्न झाले होते.मागील दोन वर्षापुर्वी तो सावनेर आगारमध्ये एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होता तर दुसरा तरूण मनोज रामा बावणे ( वय 22 ) त्याला मित्रांनी बाहेर काढले. मात्र त्याची प्रकृती खालावली असल्याने त्याला उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय राजूरा येथे हलविण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे हे दोन्ही यूवक टेबुर्वाही गावातील रहीवाशी होते.
या घटनेची माहीती मिळताच विरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल चव्हाण यांच्या मार्गदर्नाखाली माच्छीमारच्या मदतीने रुपेश कुळसंगेचा शोध सुरू आहे