आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती झालेल्या नुकसानाची पाहणी करून घेतला आढावा. -खा.अशोकजी नेते.

▪️अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी धावले खा.अशोकजी नेते.

 

*🔹शिल्पा बनपूरकर*
*🔹संपादक*
*🔹मो.न.7030292628*

गडचिरोली : ( इंडिया 24 न्यूज ) – गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील दहा ते पंधरा दिवस सततच्या संतधारपाण्याने अतिवृष्टी झाली. याअतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक धरणे,तलाव,नदी,नाले तसेच गोसीखुर्द,आसोलामेंढा, संजय सरोवर,मेडिगट्टा प्रकल्प,इत्यादी हि धरणे तुडुंब भरल्याने सततच्या पावसाने व धरणाचा पाणी सोडल्याने अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक शेतकऱ्यांची शेतीची नुकसान होऊन तसेच ग्रामीण भागात घरामध्ये पाणी शिरून अनेक नागरिकांचे घरे पडले.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी जास्त प्रमाणात असत्याने अनेक शेतकऱ्यांची धान्याची पिके धान्य (भात) सोयाबीन, कापूस इत्यादि ही पिके नष्ट होऊन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुबार पेरनीची संकट निर्माण झाले आहे.
परंतु दिल्ली येथे अधिवेशन चालू असल्याने तसेच याच अधिवेशनाच्या सत्रांत राष्ट्रपती निवडणूक,शपथविधी तसेच उपराष्ट्रपती निवडणूक या कार्यक्रमांमध्येच असल्याने अतीवृष्टी व पुराची पाहणी करण्यासाठी
खासदार साहेब तात्काळ येऊ शकले नाही.
परंतु या परिस्थितीची जाणीव होताच लगेच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये 377 नियमाच्या मुद्दाच्या आधारे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी. गावामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे पूरग्रस्तांना सुरक्षा स्थळी हलवण्याच्या सुचनासुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
अधिवेशनामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे लगेचच या बाबीचा गांभीर्य लक्षात घेता केंद्र शासनाचे पथक अतिवृष्टी व पूर परिस्थित झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पाहणी केली.
तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,मान.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दौरा प्रसंगी आले असता पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्हातील पूर परिस्थितीबद्दल सुचना देऊन पूर परिस्थितीचा आढावा दिला होता.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी,व पुरपरिस्थितीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेऊन पाहणी करण्यात आली.
या परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन खा.अशोकजी नेते यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना अन्नधान्याची कीड,ब्लॅंकेट,भांड्याची साहित्य इत्यादी ,साहित्ये वाटप करण्यात आले.
यावेळी गड-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खा.श्री. अशोकजी नेते यांनी तालुक्यातील पूरपरिस्थिती बाबत आढावा घेतला व शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाई बाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले,यावेळी महसूल,कृषी,या विभागाची माहिती,जाणून घेतली.
याप्रसंगी बाबुरावजी कोहळे भाजपा ज्येष्ठ नेते,रविभाऊ ओल्लारवार महामंत्री भाजपा, चांगदेवजी फाये जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा,जितेंद्र शिकतोडे तहसीलदार,पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण कांदे,जगदीश दोंडे सवर्ग विकास अधिकारी सिरोंचा बोबडे मंडळ कृषी अधिकारीदामोधरजी अलगेलवार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, स्वप्नील वरघंटीवार प्रदेश सदस्य,ओमकार मडावी सहसंयोजक सोशल मीडिया,शंकर नरहरी तालुका अध्यक्ष भाजपा,सतिश पद्मातेन्ती जिल्हा महामंत्री युवा मोर्चा,तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.