ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*उर्जानगर जि. प. शाळेत जागतिक हिवताप दिवस मोठ्या थाटात साजरा..!*

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

*चंद्रपुर :- येथील उर्जानगर कोंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज दिनांक 25/04/2024 ला प्रा.आ.केंद्र दुर्गापूर अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र 1, 2 व 3 च्या सर्व आशाताईंनी मिळून जागतिक हिवताप दिवस थाटात साजरा केला.*

*सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. संतोषभाऊ पारखी, उर्जानगर ग्रा. पं. सदस्य राजूभाऊ डोमकावळे, मुख्याध्यापक मा. धानोरकर सर, दुर्गापूर प्रा. आ. केंद्र वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. आशिष वाकडे सर , आरोग्य सहाय्यक खामनकर सर, मेश्राम सर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी दिपक मंदूरकर, आरोग्य सेवक लाकडे, आशा गटप्रवर्तक सारिका गेडाम, आशाताई :- जयवंता रामटेके, संगीता मोरे, कुसुम येलमुले, किरण दहिवले, अनिता चिवंडे व शिक्षकवृंदांची उपस्थिती होती.*

*तसेच जागतिक हिवताप दिवसाविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा व रॅली मध्ये सहभाग नोंदवुन रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक शिवाणी भारद्वाज तर दूसरा क्रमांक प्रेरणा क्षिरसागर यांनी पटकावुन अतिशय बोलकी व आजच्या दिनाचे संदेशवहन करणारी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली.*

*त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे यांनी 25 एप्रिल जागतिक हिवताप दिवसाविषयी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर हिवताप जनजागृती संबंधित घोषणा करत गावातून रॅली काढण्यात आली.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.