आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️नागमंदिर ते गवराळा रोड तत्काळ बनवा. असा इशारा..- आम आदमी पार्टी भद्रावती निवेदन देऊन केली मागणी..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

भद्रावती – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने भद्रावती नगर परिषदेमध्ये नागमंदिर ते गवराळा मार्गाच्या दुरुस्ती आणि पुनर्निर्माणाच्या मागणीसाठी आज एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. नगरपरिषदे मध्ये आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांच्या मार्गदर्शनात, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार यांच्या नेतृत्वात हा निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केला.

या मार्गावर सतत वाढत असलेली वाहतूक आणि वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, त्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: पावसाळ्याच्या काळात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते, ज्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

या निवेदनात मागणी केली आहे की, नगरपरिषद त्वरित या मार्गाच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू करावी. नवीन रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांची पूर्तता करण्यात यावी आणि कार्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत.

नगरपरिषदेने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी विनंती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार यांनी केली आहे. यासाठी जर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर आम आदमी पार्टी च्या वतीने नागरिकांना घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनावर मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यावर तातडीने विचार करण्यात येईल व येत्या काही दिवसात त्या रस्त्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, तालुका प्रमुख सुरज खंगार, राजकुमार चट्टे, अमित कसारे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.