आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव कोणी दिला ? देवेंद्र फडणवीस म्हणतात, ”त्यावेळी”..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई – (इंडिया 24 न्यूज )राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या.
यावेळी सर्वांना आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना भा.ज.पा.ने धक्कातंत्र वापरात एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली.
याबाबत आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.

एका इंग्रजी माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयाबाबत भाष्य केलं आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय कोणाचा होता असा सवाल फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले,
त्यावेळी परिस्थितीनुसार गोष्टी बदलत होत्या.
कधी काय निकाल लागेल हे सांगणे कठीण होते
परंतु तुम्हाला निश्चित सांगतो,एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला.
यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता.” या आला वरिष्ठांनी देखील मान्यता दिल्यामुळे शिंदेना मुख्यमंत्री करणे हा माझ्यासाठी धक्का नव्हता असं देखील फडणवीस यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले.

उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय मात्र धक्का होता
मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारेल हा माझ्यासाठी धक्का होता असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर ते या निर्णयावर ठाम होते त्यांनी यातच पार्टीचे हित असल्याचे म्हंटले असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी यावेळी दिल.
या निर्णयानंतर माझ्या मनात प्रचंड विचार सुरु होते ते त्यावेळी चेहऱ्यावर देखील दिसत होते ही बाबा मी लपवणार नाही परंतु यानंतर मला राज्यासह देशातून या निर्णयाबाबत पाठींबा मिळाल्याचे देखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.