▪️आकापूर येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान… पंतप्रधान जनमन शिबिराचे आयोजन…
▪️शासकीय योजना राबवताना शासन आपल्या दारी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज) : तहसील कार्यालय मूल आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांचे मार्फत जि.प.शाळा आकापूर येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान /पंतप्रधान जनमन योजने अंतर्गत आदिवासी बांधवांकरिता शिबिराचे आयोजन दिनांक २३/०६/२०२५ रोजी करण्यात आले. या शिबिरात नायब तहसीलदार मूल श्री दिनेश पवार, दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा, नागपूर विदर्भ प्रांत,गृहपाल श्री. प्रशांत फरकाडे (आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मूल), डॉ आनंदराव कुळे, जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना मूल , राजेश शिरभाते, तालुका पुरवठा निरीक्षक मूल,भास्कर आबाजी हजारे सरपंच, उपसरपंच ग्रा. प. आकापूर,ग्राम महसूल अधिकारी अनिल मॅकलवार ,व्ही.जी. निमगडे कृषी विभाग, ग्रामसेवक श्री बंडू बारसागडे , श्री मशाखेत्री सेतू केंद्र संचालक, पोलीस पाटील रमेश येरमे, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिबिरात उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या सेवा आपल्यापर्यंत पोहचल्या असून आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. दिनेश पवार नायब तहसीलदार मूल यांनी आकापूर येथील जनतेला केले.
आपल्याओघवत्या शैलीत सरळ जनतेच्या मनातील भावना पुढे ठेवताना शासनाच्या या अशा शिबिराच्या आयोजनाचा उद्देश जरी चांगला असला तरी प्रशासकीय यंत्रणेतील काही स्थानिक जनतेच्या सेवकांच्या मनापासून सहकार्य करण्यातील काहीशा असंमजसपणामुळे *शासन आपल्या दारी* पोहोचूनही जनतेसाठी आयोजित या उपक्रमाला जनतेची उपस्थिती व असहकार्य कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले व स्थानिक ग्रामस्तरावर कार्यरत अधिकारी व पदाधिकारी यांनी आपण समाजाचे सेवक आहोत आणि आपल्या मायबाप जनतेच्या हितासाठी आयोजित अशा कार्यक्रमांची माहिती एक अधिकारी म्हणून नाही तर समाजाचे सेवक म्हणून सर्वसामान्य माणसाला करुन दिली तर अशा कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी वेगळे प्रयत्न आणि उपस्थिती नव्हती असे म्हणण्याची वेळ येणार नाही परंतू दुर्दैवाने तेच घडताना दिसत नाही, आणि जनतेचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही असे म्हणण्याची वेळ येते असे स्पष्ट मत व्यक्त केले व जनसेवकांनी याबाबत चिंतन करण्याची गरज प्रतिपादन केली.
श्री शिरभाते यांनी राशन धान्य वितरणाची व शासकीय योजना याबाबत माहिती दिली.
गृहपाल प्रशांत फरकाडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत माहिती दिली.तर कार्यक्रमाचा समारोप करताना उपसरपंच आकापूर यांनी दीपक देशपांडे यांच्या वक्तव्याला उचलून धरत अशा कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी स्थानिक अधिकारी व पदाधिकारी यांनी ग्रामीण भागातील जनतेला या कार्यक्रमाची माहिती योग्य पद्धतीने पुरविण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत हे मान्य करताना शासनाने आमच्या छोट्या गावाची निवड करुन गावात हा उपक्रम राबविला याबाबत शासनाचे मनापासून अभिनंदन आणि स्वागत केले.व आजनंतर अशा कार्यक्रमांना ग्रामस्थ सहभागी होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय मूलचे वतीने ग्रामस्थांची सिकलसेल तपासणी व वेगवेगळ्या तपासण्या केल्या गेल्या तर सेतू केंद्रा मार्फत जातीचे दाखले, उत्पन्न दाखले काढण्यात आले. ग्रामसेवक श्री बारसागडे यांनी सूत्रसंचालन केले. शिबीर यशस्वी करण्याकरिता शासकीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते तर बऱ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला पाठही दाखवली होती मात्र ग्रामस्थांनी उत्तम सहकार्य केले व या शिबिरात सहभाग दर्शविला.