▪️येणापूर चित्तरंजनपुर येथे जनावरांचे लसीकरण शिबिर..
▪️आला पावसाळा जनावरांना सांभाळा..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता मानवासह जनावरांनाही विविध आजारांची लागण होते. त्याअनुषंगाने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत केवळराम हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी येनापूर चित्तरंजनपुरयेथे येथील पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २६ जून रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
घटसर्प हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर निश्चित रामबाण उपचार नाही. त्यामुळे रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण करून नियंत्रण मिळवता येते. घटसर्प हा रोग ‘पाखुरीला मल्टिसीडा’ या जिवाणूपासून होतो. लसीकरण हाच या आजाराच्या नियंत्रणाचा योग्य पर्याय आहे. घटसर्प या रोगाचा गाय, म्हैस, शेळी यांसारख्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव दिसतो. तापाची तीव्रता १०६ फॅरनहाइटपर्यंत जाते. गळ्याला सूज येते तसेच जीभही सुजलेली दिसून येते. खाताना तसेच गिळताना अत्याधिक त्रास होतो. घशातून घरघर आवाज येतो. तोंडातून लाळ वाहते. इत्यादी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. जनावरे एक ते दोन दिवसांत दगावतात.
याप्रसंगी सरपंच सोनी मंडल, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिकेत चिचामे, पशुपर्यवेक्षक संजय रायसीडाम तसेच पशु सख्या यांनी विविध रोगाबद्दल गावातील पशु पालकांना मार्गदर्शन केले व लस दिली .गोठ्याची स्वच्छता कशी ठेवावी,यासह रोगाचा प्रसार करणारे किटाणू, डास, गोचीड आणि माशा यांच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपयोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सध्या इंटेरोटॉक्सिन रोगाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात लक्षात घेता शेळ्या, मेंढ्यांवरील रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण व जनजागृती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पशुपालक आणि शेतकरी उपस्थित होते .
सदर शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम, प्रा. प्रलय झाडे, , प्रा. छबिल दुधबळे,प्रा. पवन बुधबावरे, प्रा. निकिता येलमुले, प्रा. उषा गजभिये ,प्रा. महेंद्रकुमार लिल्हारे, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र सहाय्यक प्रा. श्रीकांत सरदारे यांच्या मार्गदर्शनात मिलन बांबोडे, कृष्णा डाकोरे, अथर्व बोरकर, शुभम धकाते, कुणाल चलाख यांनी पार पाडले.