आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश..

▪️आ. किशोर जोरगेवार आणि आ. कीर्तीकुमार भांगडीया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या विवेक नगर येथील गजानन निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत नंदा अल्लुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रित विशेष सदस्य तुषार सोम, दशरथ सिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजप नेते रवी गुरनुले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक आवेश पठाण, संजय डांगरे, गणेश तडवेकर, ब्रम्हपुरी नगर परिषदेचे सदस्य विलास निखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू बोरकर, अमोल शेंडे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी अल्लुरवार यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाच्या दुपट्टा टाकून त्यांचा प्रवेश करवून घेतला.
नंदा अल्लुरवार या माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या असून त्यांच्या घराण्याचा जिल्ह्यातील राजकारणात ठसा आहे. त्या तीस वर्षांहून अधिक काळ चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक राहिल्या असून सहकार क्षेत्रात, महिला विकासात आणि सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
भाजपमध्ये प्रवेश करताना नंदा अल्लुरवार म्हणाल्या, “आज मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला समाधान वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्व, विकासाचा दृष्टिकोन, सामान्य माणसासाठी चालवलेले विविध उपक्रम, महिला सक्षमीकरणाचे धोरण मला भावते. चंद्रपूर जिल्ह्यात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी विकासाचे काम केले आहे. मला त्यांच्या सोबत काम करून लोकांसाठी अधिक चांगले योगदान देता येईल असा विश्वास व्यक्त केला.
या प्रवेशामुळे राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नंदा अल्लुरवार यांचा काँग्रेसमध्ये दीर्घकाळाचा अनुभव, त्यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा, महिलांमध्ये असलेली लोकप्रियता भाजपच्या संघटनाला अधिक बळकटी देईल, असे मानले जात आहे.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, नंदा अल्लुरवार या अनुभवी, कणखर नेतृत्वाच्या आणि सामाजिक कामात रुजलेल्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सहकार चळवळीसाठी केलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया म्हणाले, भाजपमध्ये नंदा अल्लुरवार या प्रवेश करून आपल्या कुटुंबात सामील झाल्या आहेत. त्यांनी दीर्घकाळ सहकार क्षेत्रात लोकांशी जवळचा संपर्क ठेवला आहे. त्यांचा अनुभव, लोकांशी असलेली जवळीक पक्ष संघटनेसाठी आणि विकासासाठी मोलाची ठरेल. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू,” असे ते म्हणाले.
नंदा अल्लुरवार यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूरातील राजकारणात नवीन घडामोडींना चालना मिळेल, असे मानले जाते. काँग्रेसच्या जुन्या नेतृत्वातील मोठे नाव भाजपमध्ये सामील झाल्याने भाजपच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीला मजबुती मिळेल आणि येत्या काळातील स्थानिक निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही मानले जाते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.