▪️खताची टंचाई दाखवून वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करावी : सभापती राकेश रत्नावार यांची मागणी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज) : खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन,तूर व भाजीपाला लागवड करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही खतांची मागणी अधिक प्रमाणात केली जात आहे. वज
दरवर्षीच खरेदी विक्री सहकारी सोसायट्यांमार्फत रासायनिक खत अतिशय वाजवी व कमी दराने विक्री केली जात होती. आणि शेतकऱ्यांना जेव्हा लागेल तेव्हा DAP, युरिया, २०.२०.०.१३, इतर रासायनिक खत तात्काळ पुरविल्या जात होते. परंतु यावर्षी मात्र खाजगी कृषी केंद्र चालकांनी सुरवातीलाच कमी दराने खताची मागणी केली आणि पुरवठा होताच आपल्या गोडाऊन मध्ये साठवून ठेऊन शेतकऱ्याला खत संपल्याचे सांगून आपल्या जवळच्या व्यक्तीला अधिकच्या दराने सर्रास विक्री करतात.याची कृषी विभागाला सुद्धा माहिती होऊ देत नाही. यामधे फक्त शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.
अशा कृषी केंद्रावर शासनाने जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करून कृषी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करावे. अशी मागणी मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी केली आहे.
याच संदर्भात नियोजन भवन येथे दिशा समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी,पुरवठा अधिकारी यांचेसह जिल्ह्यातील अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
त्याच सभेत कृषी उत्पन्न बाजार समिती मुलचे सभापती राकेश रत्नावार यांनी कृषी केंद्रातर्फे रासायनिक खतांचा काळाबाजार, अधिकच्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर नक्कीच नियंत्रण करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले होते. मात्र यावर्षी कंपन्यांनी एडवॉन्स पैसे दिल्याशिवाय खत देण्यास मनाई केल्याने आधीच आर्थिक डबघाईस आलेल्या या शेतकरी सोसायटीमध्ये पैसा नसल्याने रासायनिक खताचा आवश्यक तेवढा साठा करू शकले नाही. याच संधीचा फायदा घेत खासगी कृषी केंद्रांनी खताचा साठा गोडाऊन मध्ये साठवणूक करून ठेवला असून शेतकऱ्यांना खत संपल्याचे सांगून अधिकच्या दराने विक्री केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खतांची मागणी केली असताना त्यांना त्याऐवजी २०.२०.०.१३ हे महाग असलेले खत घ्यायला लावतात. हा एकंदरीत खताचा काळा बाजार केल्या जात आहे.जिल्हा कृषी विभागाचे नियंत्रण नसल्यानेशेतकऱ्यांकडून अधिक दराने विक्री केली जात आहे. यावर जिल्हास्तरावरून त्वरित आळा घालावा.आणि शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांचा पुरवठा करावा. व खताची साठवणूक करणाऱ्या व अधिक दराने खत विक्री करणाऱ्या खाजगी कृषी केंद्र चालकांची चौकशी करून गुन्हा दाखल करावे अशी मागणी मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी केली आहे.