आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️युवाक्रांती बहुउद्देशिय संस्थेचा पुढाकार..

 

आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज) : राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र जी फडणवीस यांचा वाढदिवसाचे औचित्य सांधुन मूल येथील युवाक्रांती बहुउद्देशिय संस्थेने रक्तदान शिबीर व लोकोपयोगी विविध उपक्रम राबवुन साजरा केला.

मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले, याशिबीराचे उद्घाटन मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लाडे, बजरंग दलाचे माजी जिल्हाध्यक्ष विपीन भालेराव, युवाक्रांती बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निखील वाढई, अध्यक्ष प्रणित पाल, कार्याध्यक्ष निहाल गेडाम उपस्थित होते.

यावेळी 57 रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले रक्त संकलनासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक रक्त संकलन करण्यासाठी आले होते.
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करणा,ऱ्या युवाक्रांती संघटनेच्या माध्यमातुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्य मूल उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप, गरजु नागरीकांना ब्लॅकेंटचे वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक आणि महापुरूषांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी सोनू बट्टे, हर्षल दुपारे,सौरभ वाढई, वैष्णव पोलचलवार,साई क्रिष्णा बोर्लीवार, सुजित खोब्रागडे, साजित सय्यद पिंटु चिमुलवार, सोनल आगबनवार, अमित चलाख, आदर्श गेडाम, इश्वर लोनबले,साई आक्केवार, किशोर चौखुंडे, सचिन चौखुंडे, , तेजस महाडोळे, सुमित दुपारे यासह युवाक्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.