▪️पारंपारिक पद्धतीने कीड व्यवस्थापन म्हणजेच निंबोळी अर्क कृषी विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : केवळराम हरडे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण उद्योजकता जागृती व विकास योजना’ या उपक्रमांतर्गत 5 टक्के निंबोळी अर्क बनविण्याची पद्धत शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी 5 किलो वाळलेल्या निंबोळ्या, 200 ग्राम साबणाचा चुरा, 10 लिटर पाणी, 3 प्लास्टिक बादल्या इत्यादींचा वापर केला.
सर्वप्रथम 5 किलो वाळलेल्या निंबोळ्या यांचा बारीक चुरा करून घ्यावा मग तो चुरा 9 लिटर पाण्यामध्ये टाकून ढवळून घ्यायचे सोबतच 1 लिटर पाण्यामध्ये 200 ग्राम साबणीचा चुरा टाकून त्याला सुद्धा ढवळून घ्यायचे. हे दोन्ही द्रावण रात्रभर भिजत घालायचे जेणेकरून त्यामधील अर्क पूर्णपणे निघेल. दुसऱ्या दिवशी ते दोन्ही द्रावण पूर्णपणे कापडाच्या माध्यमातून पिळून घ्यायचे आणि एका वेगळ्या बादलीमध्ये दोन्ही द्रावण मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर फवारणी करायची. या निंबोळी अर्कमुळे कीटकांचा नियंत्रण होत असतो व पिकांवर कोणत्याही पद्धतीचा अपायकारक परिणाम होत नाही. निंबोळी अर्क बनवण्यासाठी कमीत कमी खर्च लागतो. बनविण्यास सोईस्कर आहे. पिकांना फायदेशीर आहे. वातावरणाला फायदेशीर आहे. हा निंबोळी अर्क कोणत्याही पिकांवर फवारू शकतो. प्रात्यक्षिके दरम्यान गावातील शेतकऱ्यांना व इतर लोकांना संबंधित प्रात्यक्षिकेचे पॉम्पलेट वाटून जनजागृती केली.
सदर उपक्रम केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम, कार्यक्रम अध्यक्ष प्रलय झाडे, कार्यक्रम समन्वयक छबील दूधबळे, कार्यक्रम अधिकारी पवन बुधबावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रणय रोडके, क्षितिज शेंडे, सूरज शेंडे, चंद्रशेखर निमकर, सिध्दांत उंदिरवाडे, श्रेयस पिपरे यांनी पार पाडला. प्रात्यक्षिकेदरम्यान शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.