▪️कन्नमवार जलाशयाचे पाणी आजपासून सोडणार..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी / कुनघाडा रै – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी तालुक्यात सध्या रोवणीची कामे सुरू असताना समाधानकारक पावसाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प होऊन त्यांच्यावर संकट ओढावले. त्यातच कन्नमवार जलाशयातून पाणी न सोडल्याने शेतकरी अधिक अडचणीत सापडले होते.
ही परिस्थिती लक्षात घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिनांक ४ ऑगस्ट रोजी कन्नमवार जलाशयाची पाहणी केली आणि तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्या पार्श्वभूमीवर आज विश्रामगृह येथे कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. मिलिंद नरोटे होते.
यावेळी आमदार नरोटे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व जलाशयातील पाणी उद्या ७ ऑगस्ट पासून सोडण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकाऱ्यांनी या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी करत ७ ऑगस्ट पासून पाणी सोडण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीदरम्यान आमदार नरोटे यांनी जलाशयाशी संबंधित प्रलंबित कामेही लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी या कामांच्या नियमित पाहणीसाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे असेही सुचवले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी बुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, चामोर्शी तालुका मंडळ अध्यक्ष रोषणी वरघंटे, माणिक कोहळे, नीरज रामानुजनवार, कविता किरमे, कार्यकारी अभियंता राहुल बोरघडे, घोटचे शाखा अभियंता दुधबावरे, भेंडाळा शाखा अभियंता डोंबळे, चामोर्शी शाखा अभियंता दुर्गे, तसेच विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.