ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️परमानंद तिराणीक नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड अवार्ड ने सन्मानित..

▪️प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..

 

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

वरोरा – ( इंडिया 24 न्युज ) : एखादी व्यक्ती आपण समजतो तेवढी मोठी नसते तर काही लांबच्या व्यक्तींचा मोठेपणा आपण समजतो ,त्यापेक्षा अधिक असतो ,हे अनुभवाने समजत जाते .गुणवत्तेचे ‘ पेटंट ‘ कोणाकडेही नसते. मीही अपूर्णांकच आहे,पूर्णांक नाही, मला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतरही मी समाधानी नाही ,अजून मला भरपूर पुढे जायचे आहे. असे कितीही कठीण प्रसंग आले तरी मागे हटायचे नाही .असे अनेक काटे टोचल्यानंतर माणूस पुढे जातो. असे मत सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री प्राप्त भारत सरकार माननीय डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी पुरस्कार प्रदान करते वेळी आपले विचार व्यक्त केले.
युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया व नॅशनल विदर्भ आर्ट्स कॅम्परन्स अँड अवॉर्ड शिरोमणी सिंधुदुर्गच्या वतीने आचार्य परमानंद तिराणीक यांना माननीय डॉ. रवींद्र कोल्हे सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री भारत सरकार मेळघाट अमरावती यांच्या हस्ते ‘नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व सुवर्णपदक हे होते या मंचावर परमानंद तिराणीक यांचे गुरु डॉक्टर अनराज टिपले यांना राष्ट्रीय विदर्भ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या गुरु शिष्याच्या सन्मानाबरोबरच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्पर्श थेरेपी सेंटरच्या संचालिका डॉ.प्रीती साव, न्युरो अँड फिजिओथेरेपीस्ट यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सत्कार सोहळ्या प्रसंगी आचार्य परमानंद तिराणीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले .ते म्हणाले सत्कार हा सत्कार्याचा होत असतो, त्यासाठी पात्रता असावी लागते .या पुरस्कारासाठी मी पात्र नाही मात्र दिल्या गेलेल्या पुरस्काराच्या सन्मानानुसार मी काम करीत राहील. मी मागास जमातीमधून आदिवासी असल्याने माझ्या विचारांमध्ये संघर्ष वृत्ती आहे.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड मिळालेल्या या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे नागपूर येथील मधुराम सभागृह विदर्भ साहित्य संमेलन मोरभवनात पार पडलेल्या राष्ट्रीय सन्मान समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी मा.मोरेश्वर निस्ताने फिल्म म्युझिक डॉयरेक्टर मा. प्रकाश गायकवाड जीनियस वर्ल्ड रेकॉर्ड होलर माननीय मोनिका पेटर डंटास सामाजिक कार्यकर्ती मुंबई ,मानसोपचार तज्ञ आरोग्य अधिकारी अतिथी कोल्हापूरकर, रवींद्र दिघोरे व समृद्धी प्रकाशनचे संपादक व मुख्य संयोजक मा. प्रा. डॉक्टर बाळकृष्ण थोरात उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे राज्य सरचिटणीस मा.दिपक शेवाळे यांनी व संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.