आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न..

▪️श्रीं च्या धर्मशाळेत पार पडला दानेंद्रांच्या दातृत्वाचा महासोहळा..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट द्वारा आयोजित श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच अन्नदान सत्र चालवण्यात आले होते रोज कीर्तन प्रवचन काकडा आरती अभिषेक ज्ञानेश्वरी पारायण तसेच हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला त्यानिमित्ताने हा समारोपय कार्यक्रमांमध्ये विविध निस्वार्थ सेवा देणाऱ्या सेवाधारी मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान गौरव करण्यात आला. तसेच हा महोत्सव यशस्वी करण्याकरता अनेक दानदात्यांनी सजळ हाताने मदत करून हा महोत्सव यशस्वी करण्याकरता हातभार लावला त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आला. विविध वस्तूचे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले.
श्री क्षेत्र पंढरपूर : सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारी करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाला. आषाढ शुद्ध दशमीला प्रातःस्मरणीय श्री संत वासुदेवजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव विधिवत पार पडला. या संपूर्ण पालखी सोहळ्याचे सूक्ष्म निरीक्षण करीत दानेंद्र भक्तांनी आपल्या उदार दातृत्वाने पालखी सोहळ्यामध्ये विविध प्रकारे आपले दातृत्व सर्वांसमोर आदर्शभूत ठरविले. पालखी सोहळ्यात यंदाच सहभागी झालेले स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची महाराष्ट्रातील सर्वात प्रथम मान्यता प्राप्त उपशाखा “श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर आकोट” येथील नव्यानेच दाखल झालेल्या ३५ विद्यार्थ्यांनी मनोभावे सेवा केली. या विद्यार्थ्यांचे गोड कौतुक म्हणून दानशूर सद्भक्तांनी विविध प्रकारे या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे संकल्प जाहीर केले. बघता बघता या कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त होऊन दानदात्यांनी जणूकाही वर्षावच केला होता. यांच्यासोबतच पालखी सोहळ्यामध्ये दररोज भोजन बनविणाऱ्या महिला मंडळी तसेच पायदळ वारी करणाऱ्या भजनानंद घेणाऱ्या टाळकरी मंडळींचा सुद्धा सन्मान सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाकरिता श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोटचे उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे, सचिव रविंद्र वानखडे, विश्वस्त सौ सुनंदाताई आमले, अशोकराव पाचडे, गजाननराव दुधाट, अनिल कोरपे, पुरुषोत्तम मोहोकार, वारकरी समाजसेवक प्रसिद्धीप्रमुख गजानन हरणे यांसह असंख्य मान्यवर मंडळी व वारकरी भाविक भक्त मंडळी या समारोपी कार्यक्रमाला उपस्थित होती.

यांच्या संकल्पनेतून साकारला दातृत्वाचा सोहळा

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रद्धा सागर, आकोट येथील विविध कार्यक्रमांकरिता असंख्य भक्त रात्रंदिवस झटत असतात. यांपैकी काही भक्त संस्थेच्या उत्कर्षासोबतच संस्थेचे हित जपण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील असतात. पालखी सोहळ्यामध्ये विविधांगी सेवा देणाऱ्या अनेक सदभक्तांचा यथोचित सन्मान व्हावा, ही सर्वात प्रथम संकल्पना संस्थेचे अध्यक्ष ह भ प वासुदेव महल्ले , दिंडी सोहळा प्रमुख व्यवस्थापक श्री.ह.भ.प. अंबादास महाराज मानकर व श्री.ह.भ.प. उमेश महाराज मोहोकार यांनी मांडली. बघता बघता या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. हे सर्व नियोजन व आयोजन करण्याकरिता यानी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या अभिनव संकल्पनेचे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट द्वारा अभिनंदन करण्यात आले आहे.

भजनी मालिका विद्यार्थ्यांना सस्नेह भेट

श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धा सागर, आकोट येथील विद्यार्थ्यांना श्री संत भास्कर महाराज भजनी मंडळ, हिंगणी बु. यांच्याकडून ३५ भजनी मालिका सस्नेह भेट देण्यात आल्या.

ज्ञानेश्वरी ग्रंथ सस्नेह भेट

श्रींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना श्री हेमंतराव थोरात चिखलगाव यांचेकडून ३५ ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आले.

मराठी व्याकरण पुस्तिका भेट

सर्व विद्यार्थ्यांना श्री गजानन पा. दुधाट यांचे कडून ३५ मराठी व्याकरण पुस्तिका सस्नेह भेट देण्यात आल्या.

भजनाकरिता टाळ सानंद भेट

सर्व विद्यार्थ्यांना वारकरी सांप्रदायिक भजनाचा खरा आनंद मिळण्याकरिता सौ लताताई सुरेंद्रजी चिकटे, माळेगाव बाजार यांचे कडून ३५ टाळ आशाबाई बाबाराव मोरे पिंपळखुटा व श्रीमती वैराळेताई पिंपळखुटा यांच्याकडून ५ टाळ सानंद भेट देण्यात आले.

श्रीमद्भगवद्गीता सादर भेट

वारकरी शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना श्री अरुणराव हिंगणकर, कालवाडी यांच्याकडून अन्वय अर्थ पदच्छेदासह ३५ श्रीमद् भगवगीता सादर भेट देण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला होतो समारोपे कार्यक्रमात पूर्ण केला.

विद्यार्थ्यांना वारकरी गणवेश भेट

विद्यार्थ्यांना वारकरी पोशाखामध्येचत शिक्षण घेता यावे याकरिता ३५ वारकरी भक्तांनी देणगी दिली आहे. या देणगीतून प्रत्येक विद्यार्थ्याला धोतर, शर्ट, टोपी, दुपट्टा असा वारकरी गणवेश देण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री ह भ प वासुदेव महल्ले यांनी ५० धोतर तर त्रिधारा संस्थान यांचे कडून विद्यार्थी व वारकऱ्यांकरता १२५ धोतर देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

टाळकऱ्यांना प्रवास बॅग सस्नेह भेट

संपूर्ण महिनाभर श्रींच्या पालखी सोहळ्यासोबत पायी पदयात्रा करून सर्वांना भजनानंद देणाऱ्या सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळींना यांना बाळकृष्ण आमले, अमरावती यांच्याकडून प्रवास बॅग सप्रेम भेट देण्यात आल्या.

महिला सेवाधार्‍यांना माहेरची साडी-चोळी भेट…

गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहमध्ये दररोज सकाळी सात वाजता पासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत हजारो लोकांचा स्वयंपाक करणाऱ्या हिंगणी येथील श्री महिला स्वयंपाक मंडळ यांचे करिता पंढरी या संतांच्या माहेरातील साडी-चोळी देण्यात यावी, ही अभिनव संकल्पना घेऊन सौ लताताई चिकटे, सौ सुनंदाताई आमले, सौ नंदाताई टीकार, सौ निर्मलाताई पुंडकर, सौ निर्मलाताई राठी, सौ वंदनाताई थोरात, सौ वैशालीताई पाचडे यांनी २६ महिला भगिनींना साडी, लुगडे ,चोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

तुळशीमाळ सुद्धा सादर भेट

या संपूर्ण हिंगणी येथील महिला स्वयंपाक सेवाधारी मंडळींकरिता तसेच आचारी व इतर सेवाधारी मंडळींकरिता श्री ह भ प आत्माराम महाराज वाकोडे यांनी तुळशीची माळ सप्रेम भेट दिली.

विद्यार्थ्यांकरता श्री तुकोबारायांची गाथा भेट

श्रीं संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. मिनाबाई ठाकरे यांचे कडून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची ३५ अभंग गाथा भेट देण्याचा संकल्प जाहीर केला होता त्यांनी पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपय प्रसंगी पूर्ण करून वाटप करण्यात आले.

श्रींच्या पुण्यतिथी निमित्त ४० किलो कुरड्या अर्पण.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या आषाढ शुद्ध दशमी या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पिंप्री माळेगाव येथील संपूर्ण गावकरी महिला मंडळींनी ४० किलो ग्रॅम कुरड्या तयार करून श्रीमती कस्तुराबाई निळकंठराव जायले यांच्या पुढाकाराने ह्या कुरड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पाठविल्या होत्या. जवळजवळ दोन महिन्यापासून या सर्व महिला भगिनी या कुरड्या तयार करण्याच्या तयारीमध्ये असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपली सेवा श्रींचरणी अर्पण करून सर्व भाविक भक्तांना भोजनानंदाची तृप्ती दिली. श्री संस्थेतर्फे त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

श्री सागर महाराज परिहार यांनी नाकारली दक्षिणा

आज कोणताही महाराज म्हटले की दक्षिणे शिवाय कीर्तन प्रवचन सेवा देत नाही परंतु अशा बिकट परिस्थितीतही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण पूर्णतेप्रसंगी श्री भास्कर महाराज संस्थान, अडगावचे निष्ठावंत विद्यार्थी तथा श्री संत वासुदेवजी महाराज कृपासागर ट्रस्ट, दर्यापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री ह भ प सागर महाराज परिहार यांनी संपूर्ण सात दिवस ज्ञानेश्वरी पारायणपिठाचे नेतृत्व केले. प्रवचन कीर्तन सेवा दिली, ग्रंथ पूजन सोहळ्यामध्ये व्यास पूजेच्या वेळी श्री ह भ प सागर महाराज परिहार यांनी नम्रतेने श्री सुरेंद्रजी चिकटे यांचे कडून मिळालेली दक्षिणा नाकारली. बऱ्याच आग्रहाअंती त्यांनी ग्रंथ दक्षिणा मागितली. त्यामुळे श्री सुरेंद्रजी चिकटे यांनी तातडीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची सार्थ गाथा व सार्थ पंचदशी ग्रंथ त्यांना व्यास पूजेच्या वेळी भेट देण्यात आले.श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथील व्यवस्थापक श्री सोपान वाघ यांचा सपत्नीक सत्कार सौ लताताई सुरेंद्रजी चिकटे यांनी केला.

वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांचा सन्मान

श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्यात एक महिना पाईवारी करत सोहळ्याला प्रसिद्धी व सोशल मीडिया द्वारे प्रचार करणारे समाजसेवक वारकरी गजानन हरणे यांचा त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटच्या वतीने शाल श्रीफळ हार घालून त्यांचा त्यांनी केलेला निस्वार्थ सेवेबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या वतीने व संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करून गौरव सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानले तसेच दरवर्षी अशीच सेवा गजानन हरणे यांनी संस्थेला द्यावी असी आशा व्यक्त केली अशा प्रकारे सर्व वारकऱ्यांचा वारकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या सेवाधारींचा सन्मान समारोपीय कार्यक्रमात करण्यात आला यानंतर महा प्रसादाने या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप दिनांक 10 ला दुपारी अकरा वाजता करण्यात आला. या पुण्यतिथी महोत्सवामध्ये रोज सकाळी काकडा त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण दुपारी प्रवचन संध्याकाळी हरिपाठ त्यानंतर विविध ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले तसेच दहाही दिवस अखंड अन्नदान सत्र चालू होते कोणताही वारकरी ,व्यक्ती, भक्त उपाशी राहू नये याची दक्षता संस्थेच्या वतीने घेतली होती तसेच राहण्या करता धर्म शाळेमध्ये मुबलक अशी व्यवस्था वारकऱ्यांसाठी केली होती अशा प्रकारे सात दिवस सप्ताह पुण्यतिथी महोत्सव सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला त्याबद्दल संस्थेने सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले. या कार्यक्रमाला वारकऱ्यांची भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.