▪️संततधार पावसामुळे सावली तालुक्यातील अनेक मार्ग बंद..
▪️जिल्हाअधिकारी यांनी केली पूर पाहणी ..पंचनामे करण्याचे दिले आदेश..

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
उपरी – ( इंडिया 24 न्युज ) : गेले अनेक दिवसापासून सावली तालुक्यात संतत धार पावसामुळं सावली तालुक्याशी जोडणारे अनेक रस्ते यांना नदी, नाले,वगर, असून सावली तालुका हा विशेष म्हणजे वैनगंगा नदीच्या पात्रासी जुडल आहे व गोसेखुर्द धरणाचे पानी नदी पात्रात विसर्ग करण्यात आल्यामुळे सावली तालुक्यातील अनेक गावांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर तालुक्यासी जोडणारे जिबगांव हरांबा , शिर्शी मार्ग , कढोली सावली मार्ग, लोढोली उपरी व्याहाड मार्ग,अंतरगाव निमगाव मार्ग, चारगाव, सावली मार्ग असे अनेक रसत्याना पुराणे वेडले असल्याने मार्ग बंद झाले आहे तर सोणापूर, सामदा, कढोली, डोनाला, पेडगाव , निमगाव, जिबगाव ,अंतरगाव, शीर्शी,अशा अनेक गावातील शेतात नदीच्या पुराचे पाणी घुसल्यामुळे हजारो एकर शेत जमीन पुराच्या पाण्याखालीआली व हजारो एकर धान पीक परें, व आवत्या ची मोठी नुकसान झाले
सावली तालुक्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने सावली तालुक्यात चंद्रपूर जिल्हा चे जिल्हा अधिकारी विनय गौडा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी महसूल विभागाचे अधिकारी अजय चरडे उपविभागीय अधिकारी मुल, प्रांजली चिरडे तहसिलदार सावली, बी डी ओ संजय नैताम, वनपरिक्षेत्र विनोद धुर्वे , भारतीय जनता पक्षाचे ता अध्यक्ष किशोर वाकुडकर, जिल्हा युवा मोर्चा सचिव सुरज कीनेकार, सरपंच पुरुषोत्तम चुदरी, सदस्य राकेश गोलेपल्लीवार, प्रविण गेडाम पुण्य नगरी प्रतीनिधी, युवा अध्यक्ष नितीन कारडे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिबगांव, शिरशी परिसरात व तालुक्यात भेट देवुन पुरपरीस्थीची पाहणी केली व पुराचे पाणी कमी होताच शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.
मात्र पावसाळ्यात च्या सुरुवतीपासूनच पूर परिस्थिती निर्माण होत आहे पुन्हा तीन महिने पावसाळा बाकी असल्याने तालुक्यातील धान पीक संकटात सापडले असून पूर परिस्थिती ने नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधव यांनी केली आहे.