▪️सावली तालुक्यातील पारडी येथील रस्त्यांची दयनीय अवस्था..!
▪️चिखल व साचलेल्या पाण्यातून गावकऱ्यांचा प्रवास सुरू..! रस्ता दुरुस्त करण्याची मोठ्या संख्येने नागरिकांची मागणी..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
सावली – ( इंडिया 24 न्युज ) : सावली तालुक्यातील ग्रामपंचायत पारडी येथील नागरिकांना अक्षरशः चिखल आणि साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे.हरणघाट- पारडी ते सावली हा मुख्य रस्ता असून पारडी ते कवठी फाटा पर्यंतचा रस्ताअत्यंत खराब अवस्थेत असून, त्यावरून चालताही येत नाही, इतकी त्याची बिकट अवस्था झाली आहे.
या रस्त्यावर दैनंदिन वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, गावकरी, विद्यार्थी आणि महिला वर्गाला याच मार्गावरून सावली या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे आणि खोल चिखलामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
विशेष म्हणजे या साचलेल्या पाण्यात धामण, सर्प, विंचू, यांसारखे विषारी जीवही दिसत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणताही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावकऱ्यांनी बांधकाम विभागाचे आणि शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, तात्काळ रस्त्याचे दुरुस्ती चे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मागणीची दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.